लोकमत न्युज नेटबर्कऔंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथिल भुमिपुत्र नंदकिशोर रौंदळ हे भारतीय सैन्यदलातुन १८ वर्षाच्या सेवेतुन निवृत्त होवुन गावी आल्याने ग्रामस्थांच्यावतीने रस्तयावर सडा-रांगोळ्या काढून प्रत्येक घरांवर गुढी उभारु न रथाद्वारे मिरवणुक काढण्यात आली.येथील नदंकिशोर निंबा रौंदळ हे पहिल्याच निवडीत २००३ साली सैन्यात भरती झाले. त्यानंतर सलग १८ वर्षे देशसेवा करुन ते आपल्या घरी परतल्याने तसाळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा व त्याच्या कुटुंबियांचा समारंभपुर्वक ग्रामसन्मान करण्यात आला.तरसाळी गावातील ६ युवक सैन्यात असुन त्यांच्या कुटुंबियांना ध्वजारोहणाराचा मान देवुन सैनिकांप्रती आदर व्यक्त केला जातो. नदंकिशोर यांचा लहान भाऊ विशाल हा सैन्यात असून या सतराच्या ििमत्ताने त्यांनी काही आठवणी यावेळी कथन केल्या.कार्यक्रमाचे सुत्रसचांलन निखिल जाधव यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे लालचंद सोनवणे, सरपंच त्र्यंबक गागुंर्डे, उपसरपंच सुमन पवार, ग्रामपंचायत सदस्य लखन पवार, प्रभाकर पवार,अरूण मोहन, आव्हाटीचे सरपंच शांताराम भामरे, तात्याजी रौंदळ, संदीप रौंदळ, उत्तम रांैदळ, नामदेव बोरसे, राजेंद्र मोहन, ग्रामसेवक एन.एम.देवरे, विजय रौंदळ, मोठाभाऊ बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सेवानिवृत्त सैनिकाचा तरसाळीत ग्रामसन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 19:01 IST
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथिल भुमिपुत्र नंदकिशोर रौंदळ हे भारतीय सैन्यदलातुन १८ वर्षाच्या सेवेतुन निवृत्त होवुन गावी आल्याने ग्रामस्थांच्यावतीने रस्तयावर सडा-रांगोळ्या काढून प्रत्येक घरांवर गुढी उभारु न रथाद्वारे मिरवणुक काढण्यात आली.
सेवानिवृत्त सैनिकाचा तरसाळीत ग्रामसन्मान
ठळक मुद्देग्रामस्थांच्या वतीने त्यांचा व त्याच्या कुटुंबियांचा समारंभपुर्वक ग्रामसन्मान करण्यात आला.