शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त लष्करी कर्मचा-याकडून देवळाली तोफखाना केंद्रात प्रशिक्षणार्थी निवासात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:29 IST

दुपारी प्रशिक्षण आटोपून निवासस्थानावर आले असता त्यांनी चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच निवासस्थानाचा दरवाजाही उघडा होता अणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते.

ठळक मुद्देसंशयित देवरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले ओळखपत्र दाखवून ते देवळाली तोफखाना केंद्रात वावरत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले

नाशिक : पंजाब राज्यातील पटियाला येथील प्रशिक्षणार्थी जवान बोफोर्स तोफेचे प्रशिक्षण घेण्यासाठी देवळाली छावणीमधील तोफखाना केंद्रात दाखल झाले होते. त्यांच्या राहत्या शासकीय निवासस्थानातून मोबाइल चोरी करणा-या एका संशयित सेवानिवृत्त लष्करी अधिका-याला बंदोबस्तावर असलेल्या लष्करी शिपायाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत देवळाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पटियाला येथून बोफोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी ८ तारखेला दाखल झालेले भूदलाचे शिपाई श्याम बाबू रामरक्षपाल राजपूत (२६) हे दाखल झाले होते. ते शनिवारी (दि.२४) सकाळी दैनंदिन वेळापत्रकानुसार गोळीबार मैदानावर बोफोर्स प्रशिक्षणासाठी सहकाºयांसमवेत विद्यार्थी निवासस्थानामधून बाहेर पडले. दुपारी प्रशिक्षण आटोपून निवासस्थानावर आले असता त्यांनी चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच निवासस्थानाचा दरवाजाही उघडा होता अणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. त्यामुळे राजपूत यांचा संशय बळावला. त्यांनी तत्काळ बंदोबस्तावरील मिहीर रंजन यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आल्यामुळे भारत अशोक देवरे यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. यावेळी राजपूत यांनी तत्काळ माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर निवासस्थानाजवळ सुभेदार सोलंकी सुरेंदर हे दाखल झाले. यावेळी सुभेदार यांच्यादेखत शिपाई मिहीर व राजपूत यांनी संशयित देवरे यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पँटच्या खिशात राजपुत यांचा मोबाइल मिळून आला. देवरे हे जयभवानीरोड, उपनगर येथे वास्तव्यास असून, सेवानिवृत्त लष्करी अधिकारी म्हणून ओळखपत्र दाखवून ते देवळाली तोफखाना केंद्रात वावरत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. याबाबत फिर्यादी राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित देवरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय