शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची पुन्हा लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:07 IST

खामखेडा : कधी परतीचा पाऊस तर कधी हवामानातील बदलामुळे वाया गेलेल्या लागवडीमुळे न डगमगता परिसरातील शेतकऱ्याने जिद्द कायम ठेवत उशीरा का होईना उन्हाळ कांद्याची लागवड जोमाने सुरु केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजिद्द कायम : अस्मानी संकटांचा मुकाबला

दरवर्षी उन्हाळ कांदा लागवडीला साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाते. परंतु चालू वर्षी शेतकऱ्यांनी दोन वेळेस उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकले परंतु परतीच्या पावसामुळे सुरवातीचे बियाणे दाबली गेली. त्यानंतर महागडी बियाणे घेऊन लागवड केली परंतु पुन्हा तुरळक पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लावणीस आलेली कांद्याची रोपे वाया गेली.तरीदेखील निराश न होता शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचे बियाणे टाकली. ती आता लागवड योग्य झाल्याने खामखेडा परिसरात सर्वत्र कांदा लागवड होताना दिसून येत आहे.यावर्षी कांद्याची उशीरा लागवड होत असल्याने कालांतराने विहिरींना पाणी कमी होण्याचा धोका लक्षात घेऊन शेतकरी आता पांरपारिक पद्धतीने शेती न करता अत्याधुनिक ठिबक सिंचन ,तुषार सिंचन ,गादी वाफा पद्धतीने कांदा लागवड करतांना दिसत आहेत. त्यामुळे पिकावर रोगाचा प्रदुर्भाव होत नाही तसेच पाणी वीज व श्रमाची बचत होते. यासाठी शेतकरी सिंचन पद्धतीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. उशीरा होणाऱ्या या लागवडीसाठी मजुरांची टंचाई असल्याने बाहेरुन मजूर आणण्याची कसरत करावी लागत आहे. तसेच वीजपुरवठ्याच्या वेळा लक्षात घेऊन लागवड करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती