शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा प्रभाव ओसरताच पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:45 IST

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प् ा्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली

ठळक मुद्देपडझडीची आवराआवर : जनजीवन पूर्वपदावरनाशिक शहरात एका दिवसात १४४ मिलीमीटर पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाखाली बुधवारी नाशिकसह परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळनंतर पूर्णवेळ विश्रांती घेतली, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. दुसरीकडे वादळी वारा व पावसामुळे झालेल्या पडझडीची आवरासारव, जागोजागी उन्मळून पडलेले झाडे व फांद्या हटविण्याचे काम अग्निशामक दलाने दिवसभर सुरूच होते. वाकलेले खांब व तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण करून शहरातील विद्युत पुरवठा महावितरण विभागाने सुरू केला.

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प् ा्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तत्पूर्वी मात्र सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. शहर व परिसरात ठिकठिकाणी सुमारे दोनशेहून अधिक झाडे उन्मळून पडली तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. वादळी वा-यामुळे काही झाडे धोकादायक झाले. झाडे पडल्याने काही घरांचे पत्रे, भिंतींचे नुकसान झाले तर काही ठिकाणी वाहने दबली गेली. विजेचे खांब वाकणे, तारा तुटण्याच्या प्रकारामुळेही महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागले. नाशिक शहरात एका दिवसात १४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चोहोंबाजूकडे पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी चेंबर तुंबल्याच्या तर घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मध्यरात्रीनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळी पुन्हा काही वेळ मध्यम स्वरूपात हजेरी लावली, मात्र त्यानंतर दिवसभर पूर्णपणे विश्रांती घेतली त्यामुळे जनजीवन पूर्वत होण्यास मदत झाली. कोरोनाच्या सावटाखाली शहर व परिसरातील व्यापार, व्यवसाय व दुकाने नियमितपणे सुरू झाली तर सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती नेहमीप्रमाणे कायम होती. दुपारनंतर आकाश निरभ्र होवून सूर्यदर्शनही झाले.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक