शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आहार शिजविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची

By admin | Updated: December 4, 2015 22:41 IST

आहार शिजविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार आता शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शिजविला जाणार आहे. पोषण आहाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजनेच्या पद्धतीत काही बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षापासून पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात पोषण आहाराचा खर्च रोख स्वरूपात दिला जाणार आहे.शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीत आतापर्यंत अनेक वेळा बदल झालेले आहेत. सुरुवातीला पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी शिक्षकांवर होती. त्यानंतर हे काम महिला बचतगटांमार्फत सुरू करण्यात आले होते; मात्र ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील मोेठी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात संबंधित शाळेला फक्त तांदळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. पोषण आहार शिजविण्याचा खर्च, तेल, मीठ, डाळी आणि अन्य भाजीपाल्याचा खर्च रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी शिजविण्यात येणारा पोषण आहार आणि अन्य शाळांमध्ये शिजविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जात काय फरक आहे, याची तुलना करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती पातळीवरील पोषण आहार चांगला शिजत असल्यास, भविष्यात सर्व ठिकाणी ही संकल्पना राबविली जाणार आहे. यासाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.(प्रतिनिधी)