पेठ शहरासह सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रानभाज्यांची खरेदी करून त्यांची माहिती जाणून घेतली.
जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पावसाळ्यात उपलब्ध असलेले वासत्या, माठ, वाथरटा, कडूकंद, करटूले, आळू, खुरसाणी यासह विविध रानभाज्यांची या महोत्सवात रेलचेल दिसून आली. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी प्रास्तविकात रानभाजी महोत्सवाचे महत्त्व स्पष्ट केले. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचेही यावेळी प्रदर्शन भरविण्यात आले.
याप्रसंगी भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, गटविकास अधिकारी श्रीकांत खताळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे,महेश टोपले, शाम गावीत, भागवत पाटील, मोहन कामडी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी मुकेश महाजन, डॉ. श्रीरंग वाघ यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते. कृषी सहाय्यक अनिल भोर यांनी सूत्रसंचालन तर डॉ. श्रीरंग वाघ यांनी आभार मानले.
फोटो
- १६ पेठ रानभाज्या
पेठ येथे रानभाजी महोत्सवाची पाहणी करताना भास्कर गावित, विलास अलबाड, अरविंद पगारे, रामेश्वर गाडे, श्रीकांत खताळे, मनोज घोंगे आदी.
160821\16nsk_13_16082021_13.jpg
पेठ येथे रानभाजी महोत्सवाची पाहणी करतांना भास्कर गावीत, विलास अलबाड, अरविंद पगारे, रामेश्वर गाडे, श्रीकांत खताळे, मनोज घोंगे आदी.