मालेगाव : आॅनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरात पुकारण्यात आलेल्या औषध विक्रेत्यांच्या बंदला मालेगाव शहरासह तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा औषध विक्रेत्यांनी केला.केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संपूर्ण देशभरात औषध विक्रेत्यांनी बंद पाळला. इंटरनेटद्वारे आॅनलाइन औषध विक्रीमुळे तरुणांना नशेची सवय लागून आत्महत्त्यांचे प्रमाण वाढतील, गर्भपाताच्या गोळ्या आॅनलाइन मिळू लागल्यामुळे केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला हरताळ फासला जात असून, देशातील आठ लाख औषध विक्रेते व त्यावर अवलंबून असणाऱ्या ४० लाख कर्मचाऱ्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न असल्याने देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला होता. परवानगी नसताना आॅनलाइन औषधांची विक्री होत असल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील सर्व औषध विक्रेत्यांनी सहभाग घेऊन आपापली दुकाने बंद ठेवली होती.मालेगाव केमिस्ट असोसिएशनतर्फे अपर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अपर पोलीस अधीक्षक यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष किरण छाजेड, दीपक शेलार, संदीप मंडलिक, मो. जिलाली अब्बास अली, राजेंद्र कासलीवाल, मो. आरिफ अब्दुल रज्जाक, गौतम चोरडिया, किरण अक्कर, ललित बाफना, राजेंद्र धामणे, आशिष पटेल, राजेंद्र धांडे, कौस्त्ुाभ कोतकर, महेश धामणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
औषध विक्रेत्यांच्या बंदला प्रतिसाद
By admin | Updated: October 14, 2015 23:59 IST