शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या घरांना मिळेना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:17 IST

आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हाडा प्रकल्प पूर्ण होऊनही मागणीअभावी अजून रिक्तच आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर व म्हाडाच्या सदनिकांचे दर यात फरक असून, खासगी व्यावसायिकांपेक्षा दर अधिक असल्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहेत.

आडगाव : आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हाडा प्रकल्प पूर्ण होऊनही मागणीअभावी अजून रिक्तच आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर व म्हाडाच्या सदनिकांचे दर यात फरक असून, खासगी व्यावसायिकांपेक्षा दर अधिक असल्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहेत. आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलजवळील सर्व्हे नं. १५६०/१ ही जागा शाळेला मिळावी, अशी ग्रामस्थांची भूमिका होती. त्यासाठी ग्रामस्थांनी जनआंदोलनदेखील केले होते, पण कोणत्याही विरोधाला न जुमानता मागीलवर्षी कामाला सुरुवात झाली. मात्र दुसरीकडे काही वर्षांपूर्वी आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर बांधण्यात आलेली घरे अजूनही रिक्तच आहेत. येथील सर्व्हे नं ६०९ मध्ये ४१६ सदनिकांची वसाहत असून, या घरांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा ही शासकीय संस्था असून, त्यांच्या घरांच्या तुलनेत खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर कमी आहेत. त्यामुळे महाग असलेल्या म्हाडाच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका वसाहतीचे काम पूर्ण होऊनही प्रतिसाद मिळत नसताना दुसरा प्रकल्प पूर्ण करण्याचा अट्टाहास म्हाडा कशासाठी करीत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने आडगावचे ग्रामस्थ करीत आहे. आडगाव येथील शाळेसाठी आवश्यक असलेल्या भूखंडावर घरे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला होता. तसेच आंदोलनेदेखील केली होती.गेल्यावर्षी म्हाडाच्या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन उभे करून विरोध केला होता. कारण म्हाडाचा आधीच पूर्ण झालेला प्रकल्प रिक्त असताना दुसरा प्रकल्प कशासाठी, अशी ग्रामस्थांची भूमिका होती. पण ग्रामस्थांचा विरोध असताना नवीन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. - अभय माळोदे,  स्थानिक रहिवासी

टॅग्स :mhadaम्हाडाHomeघर