शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून पुन्हा ‘देऊळबंद’चा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:27 IST

कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले; परंतु त्यासंदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत.

नाशिक : कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले; परंतु त्यासंदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. सिडको पाठोपाठ पंचवटीतही श्री स्वामी समर्थांचे मंदिर सीलबंद करण्यासाठी कर्मचारी पोहोचले; परंतु स्थानिक नगरसेवकाने केलेला विरोध आणि त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी आयुक्तांचे आदेश असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कर्मचारी माघारी परतले आणि कारवाई टळली.महापालिकेच्या मिळकतींचा दुरुपयोग होत असल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल आहेत. त्या आधारे महापालिकेच्या वतीने सुमारे आठवडाभरापासून मिळकती सील करण्याचा सपाटा सुरू आहे. अभ्यासिका, व्यायामशाळा, वाचनालये, क्रीडा संकुले याबरोबरच मोकळ्या जागेतील ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र, हास्य क्लब, योगा केंद्र तसेच अन्य मिळकती सील करण्यात आल्या आहेत; परंतु सिडकोतील खुटवडनगर येथील मोगलनगरातील श्री स्वामी सेवा केंद्र भाविकांना बाहेर काढून सील करण्यात आले. यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (दि.९) ज्या मिळकतीचा कोणत्याही शुल्काशिवाय वापर होत असेल तर अशा मिळकती सील करणार नाही आणि सील केले असेल तर ते काढून घेतले जाईल असे स्पष्ट केले आहे. तरीही शुक्रवारी (दि. १०) पंचवटीत लोकसहकारनगर येथील श्री स्वामी सेवा केंद्र सील करण्यासाठी कर्मचारी गेले होते.सदरचे कर्मचारी याठिकाणी गेले आणि त्यांनी तत्काळ सील लावण्याची तयारी केली. कुलूपही ठोकले. याठिकाणी अनेक भाविक हे स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण तसेच जप जाप्यासाठी येतात, त्यांच्या पोथ्याही त्याच ठिकाणी होत्या त्यादेखील काढू दिल्या नाहीत. सदरचा प्रकार सुरू असतानाच भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील हे तेथे पोहोचले. त्यांनी सील करण्यासाठी असलेले आदेश दाखविण्यास सांगितले; परंतु महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही आदेश नव्हते. केवळ मिळकतींची यादी होती. आयुक्तांनी मंदिरे सील करायची नाही हे स्पष्ट आदेश दिले होते. त्याची माहितीही त्यांना नव्हती. अखेरीस जगदीश पाटील यांनी पंचवटीच्या विभागीय अधिकाºयांना फोन केला आणि स्पीकरवर त्यांच्याशी संभाषण करून ते कर्मचाºयांना ऐकविले. यावेळी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी नि:शुल्क वापर असलेल्या मिळकतींवर कारवाई करू नये यासंदर्भातील आयुक्तांचे आदेश प्राप्त झाल्याचे नमूद केले; परंतु सदरचे आदेशच मिळाले नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले, त्यातून विसंवाद उघड झाला. अखेरीस कर्मचारी सील न लावताच परत गेले.महापालिका प्रशासन मुळातच उच्च न्यायालयाचे आदेश नसताना इमारती सील करीत आहेत. त्यातच ज्याचा आर्थिक कारणांसाठी वापर करायचा नाही अशा मिळकती सील करू नये असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश दिल्यानंतरही कर्मचारी जाणीवपूर्वक जाऊन अशा मिळकतीदेखील सील करीत आहेत. स्थानिक नगरसेवकांना हा बदनाम करण्याचा प्रयत्न आहे काय, अशी शंका यामुळे येत असून, या प्रकाराची चौकशी करण्याची गरज आहे.- जगदीश पाटील, नगरसेवक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर