शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:45 IST

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समिती: जिल्हा परिषद देणार आशा कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक आॅनलाईन सभा शुक्रवारी (दि.२५) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरूवातीस डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. यंदा जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यातच गेल्या आठवडयापासून जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप पीकांना बसला असून, कांद्याचे रोप वाया गेले. सोयाबीन पीकात पाणी साचल्याने सडले आहे. मकाही वाया जाण्याची शक्यता आहे. यातच शासनाकडून नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रत्येक तालुका कृषी अधिकाºयाना दिले असल्याचे कृषी सभापती संजय बनकर यांनी सांगितले. परंतू असे असतानाही ठराविक ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याची। तक्रार यावेळी करण्यात आली. नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्यात यावी असा ठराव सभेत झाला. या चर्चेत भास्कर गावित, सविता पवार यांनी सहभाग घेतला.अतिवृष्टीचा फटका पीकांना बसलेला असतानाच ग्रामीण भागातील रस्त्यांनाही बसला आहे. रस्ते उखडले आहे. रस्ते नादुरूस्त झाले आहेत. पूराने अनेक छोटे वळण बंधारे वाहून गेले आहेत. यासाठी नुकसानग्रस्त रस्ते, बंधारे यांची पाहणी करून अहवाल सादर करावा त्यास शासनाकडून निधीची मागणी करावी असा ठराव बैठकीत झाला. बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती बनकर, सुरेखा दराडे, सुशिला मेंगाळ, आश्विनी आहेर, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.कोरोना संकटात आशा, सेविका, सेवक जीवाची बाजी लावून काम करत असताना त्यांना अगदी कमी मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्याची मागणी सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोनाकाळात काम करणाºया आशांना दरमहा एक हजार मानधन देण्यात यावे असा ठराव सभेत झाला. या ठराव शासनाकडे पाठविण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले. 

 

टॅग्स :agricultureशेतीzpजिल्हा परिषद