शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

वाडे निर्मनुष्य करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:02 IST

नाशिक : तांबट लेन येथील वाडा पडल्याने पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यातील रहिवाशांना हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मात्र त्यास विरोध करण्यात आला असून, अशाप्रकारची दादागिरी चालणार नसल्याचा इशारा पक्षाचे महापालिकेतील गटनेता गजानन शेलार यांनी दिला आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादीची भूमिका : क्लस्टर न राबविल्यास आंदोलन

नाशिक : तांबट लेन येथील वाडा पडल्याने पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यातील रहिवाशांना हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मात्र त्यास विरोध करण्यात आला असून, अशाप्रकारची दादागिरी चालणार नसल्याचा इशारा पक्षाचे महापालिकेतील गटनेता गजानन शेलार यांनी दिला आहे.राष्टÑवादी कार्यालयात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस शेलार यांनी महापालिकेच्या विकास आराखड्यात गावठाण भागास चार चटई क्षेत्र इतकी तरतूद केली असतानाही सरकार ते लागू करीत नसून त्यासंदर्भातील आदेश रोखून ठेवण्यात आले असल्याने जुने नाशिक परिसराचा विकास ठप्प झाला आहे. यासंदर्भात फेरविचार करून नव्या बांधकामासाठी परवानगी सादर करावी अन्यथा सत्तारूढ आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही शेलार यांनी दिला आहे.महापालिकेच्या हद्दीत एकूण २६ ठिकाणे आहेत; मात्र ते मूळ रहिवासी असून, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने शहराचा विकास करताना त्यांना विशेष सवलती देण्याची गरज आहे. नाशिक शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांना सर्व भागाची पाहणी करण्यास विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी नियमावलीत कलम १५ नुसार अडीच एफएसआय मंजूर केला होता; मात्र अंतिमत: विकास आराखड्यात सध्याच्या दोन चटई क्षेत्रातदेखील घट करून दीड चटई क्षेत्र ठेवण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकBuilding Collapseइमारत दुर्घटना