शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला विरोध, कळवणला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:26 IST

पूनंदचे पाणी पेटले : भाजपावगळता अन्य पक्षांचा सहभाग

ठळक मुद्देमुख्यमंत्री जलवाहिनीच्या भूमिपूजनाला आले तरी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी तुरूंगात जाऊ ,असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर यांनी दिला.

कळवण : कळवण तालुक्यातील अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीला तालुक्यातील भाजपा वगळता अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह शेतकरी, नागरिकांनी तीव्र विरोध करत कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. ठिय्या आंदोलनानंतर मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. दरम्यान शनिवारी (दि.९) सुपलेदिगर येथे अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पावर जलआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार यांनी यावेळी दिली.आमदार जे.पी. गावीत,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,डॉ भारती पवार, मविप्रचे माजी संचालक रविंद्र देवरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सभापती शैलेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जेष्ठ नेते नारायण हिरे,अण्णा पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रकाश आहेर,उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, माकपचे हेमंत पाटील, मोहन जाधव, छावाचे प्रदीप पगार आदी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांया नेतृत्वाखालील कोल्हापूर फाटा येथे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री जलवाहिनीच्या भूमिपूजनाला आले तरी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी तुरूंगात जाऊ ,असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर यांनी दिला. पश्चिम वाहीन्यातील पाणी आमच्या धरणात टाका मग पाण्यावर हक्क सांगा. कळवण तालुक्यातून सत्तेचा गैरवापर करून पाणी पळवुन नेले जात असल्याचा आरोप माकपचे तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी केला. जलवाहिनीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनीही विरोध केला. पुनंदच्या पाण्यावर हक्क सांगण्याचा सटाणेकरांना अधिकार नसून केळझर व हरणबारी धरणातील पाण्यावर हक्क दाखवा. अन्य तालुक्यातील जनता हक्क सांगत असल्याने संघर्षाला सज्ज होण्याचे आवाहन वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रकाश आहेर, संतोष मोरे, रायुकॉचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, रायुकॉ तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी करु न योजनेला विरोध केला. रस्ता रोको आंदोलनात परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी