शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

स्थलांतराऐवजी रहिवाशांचा ठिय्या

By admin | Updated: August 4, 2014 02:11 IST

स्थलांतराऐवजी रहिवाशांचा ठिय्या

 

नाशिक : गेल्या शनिवारपासून महापौरांनी आश्वासन देऊनदेखील गढीवर हजेरी न लावल्यामुळे येथील संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज सकाळी स्थानिक नगरसेवकांसोबत धोकेदायक झालेल्या गढीच्या काठावरच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संरक्षक भिंत बांधण्याची व जुन्या घरांच्या सुरक्षेची लेखी हमी जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही स्थलांतरित होणार नाही, असा पवित्रा गढीवरील संतप्त रहिवाशांनी घेतल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिल महाजन यांच्यापुढे नवा पेच निर्माण झाला व त्यांनी गढीवरून काढता पाय घेतला. दुपारी चार वाजेपर्यंत गढीवरील आबालवृद्धांचे ठिय्या आंदोलन व घोषणाबाजी सुरूच होती.शहरात गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे चार दिवसांपूर्वी गढीचा धोकेदायक झालेला काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. तसेच माळीण गावावर कोसळलेल्या डोंगराच्या घटनेची धास्ती घेत महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी तत्काळ हालचाली गतिमान केल्या. दरम्यान, स्थानिक नगरसेवक विनायक खैरे यांनी ‘रामायण’वर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते यांच्यासोबत दीड ते दोन तास काझी गढीच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली, तसेच गाडगे महाराज धर्मशाळेच्या विश्वस्तांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा के ल्यानंतर विश्वस्त मंडळाने पंधरा खोल्या उपलब्ध करून देण्याचे क बूल केले. तसेच लगतच्या महापालिकेच्या दवाखान्यात, शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी प्रशासनाकडून चालविली जात होती; मात्र रहिवाशांनी गढीवरून स्थलांतरित होण्यास स्पष्ट नकार दिला. (प्रतिनिधी)