शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राखीव वनक्षेत्र : पांडवलेणी डोंगरावर भटकंती ठरणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:33 IST

पांडवलेणी डोंगरावर हौशी ट्रेकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती करणा-या उपद्रवींचे प्रमाणही वाढत आहे.

ठळक मुद्देभारतीय वन कायद्यान्वये गुन्हा ठरतो. विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती

नाशिक :पांडवलेणी अर्थात त्रिरश्मी डोंगरावर लेणीपर्यंत पर्यटक जाऊ शकतात; मात्र लेणी ओलांडून डोंगरमाथा चढणे किंवा डोंगराच्या मध्यावर थांबून राखीव वनक्षेत्रात भटकंती करणे भारतीय वन कायद्यान्वये गुन्हा ठरतो. हा संपूर्ण ९३ हेक्टरचा परिसर राखीव वन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात प्रवेश करण्यापुर्व वनक्षेत्रापालांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक ठरते. विनापरवाना या भागात भटकंती करणाऱ्यांविरूध्द वनविकास महामंडळाकडून कारवाई करण्यात येणार आहे.पांडवलेणी डोंगरावर हौशी ट्रेकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती करणा-या उपद्रवींचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वनविकास महामंडळाने गंभीर दखल घेतली असून या राखीव वनक्षेत्रात अतिरिक्त वनरक्षकांची गस्त वाढवून विनापरवाना भटकंती करणाºया लोकांना चाप लावणाार आहे. काही दिवसांपुर्वीच याच भागात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरूणाला डोंगराच्या कपारीमध्ये बसलेल्या बिबट्याने सकाळी सात वाजेच्या सुमारास पंजा मारल्याची घटना घडली होती. तसेच रविवारी पती-पत्नी या ठिकाणी डोंगरमाथ्यावर अडकले आणि यंत्रणेला ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवावे लागले. तसेच काही उपद्रवी लोकांकडून राखीव वनक्षेत्रात सर्रासपणे भटकंती करत धुम्रपान, मद्यपान करून वनक्षेत्राला व पर्यावरणाला आणि तेथील जैवविविधतेला धोका निर्माण करण्याचाही यापुर्वी प्रयत्न झालेला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी वनविकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची मागणी होत आहे. नेहरू वनोद्यानासह पांडवलेणी वनक्षेत्र संवर्धन संरक्षणासाठी वाढीव मनुष्यबळ पुरविणे गरजेचे आहे. राखीव वनक्षेत्रात नियमीत गस्त वाढविल्यास भटकंती करणा-या हौशी लोकांचा उपद्रव थांबेल असे निसर्गप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे. लेणींचे सौंदर्य बघण्यास कोणाचीही हरकत नाही; मात्र लेणी बघून झाल्यानंतर पाय-यांनी खाली उतरण्याऐवजी राखीव वनक्षेत्रात भटकंती करण्याबाबत पर्यटकांना पुरातत्व विभागाने मनाई करावी. तसेच सुचना फलक या भागात लावावेत.

टॅग्स :Pandav cavesपांडवलेणीNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलforest departmentवनविभाग