शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

जमियत उलमा-ए हिंदचे आरक्षणासाठी मालेगावी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:24 IST

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देशुक्रवारचा मुहूर्त : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर

आझादनगर : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील किदवाई रस्त्यावर शुक्रवारी लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मुस्लीम समाजाचे अभ्यासक मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांनी देशाच्या २० टक्के नागरिकांमध्ये शासनाप्रती अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने मुस्लीम समाजाला तत्काळ आरक्षण देऊन मुस्लीम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. जमियतचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती आसिफ अंजुम नदवी, आमदार आसिफ शेख उपस्थित होते.मुस्लीम समाजाने इंग्रजांविरुद्ध प्रथम १८०३ मध्ये शाह अब्दुलअजीज यांनी प्रथम फतवा दिला. स्वदेशीचा नारा सर्वप्रथम मुस्लीम समाजाकडून दिला गेला. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुतीही मुस्लिमांनीच मोठ्या प्रमाणावर दिली; मात्र आज याच देशात दुर्बल घटकापेक्षाही खालच्यास्तरावर जीवन जगणाºया याच समाजास सरकारकडून न्याय दिला जात नाही ही खेदजनक आहे. म्हणून सरकारने ९ सप्टेंबर २०१४ च्या परिपत्रकानुसार दिलेले आरक्षण न्यायालयाने रद्द केले होते.आमदार आसिफ शेख, सुफी गुलाम रसुल, शाकीर शेख, शफीक राणा यांची भाषणे झाली. धरणे आंदोलनात मौलाना अब्दुल हमीद जमाली, मौलाना अनिस अजहरी, आसिफ शाबान, इरफान फैजी, कारी अखलाक अहमद जमाली, अय्युब कासमी यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.उच्च न्यायालयानेच अध्यादेशावर निर्णय देताना मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देणे योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र शासनाने आजपर्यंत आरक्षण दिलेले नाही. म्हणून राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय, सेवेसह शिक्षणात आरक्षण द्यावे, विविध आयोगांच्या अभ्यासानंतर दिलेल्या अहवालानुसार व शिफारशी अन्वये राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी राज्य घटनेच्या तरतुदीनुसार विशेष मागास प्रवर्ग (अ) चे निर्माण करुन त्यात मुस्लिमांचा समावेश करावा. घटनेच्या अनुच्छेद १६ (४) मधील तरतुदीनुसार शासकीय व निमशासकीय सरळ सेवा भरतीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त पाच टक्के आरक्षण द्यावे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

टॅग्स :MalegaonमालेगांवMuslimमुस्लीम