शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेस्क्यू : उष्माघाताने शेकडो फूट उंचीवरुन गिधाड कोसळले जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:46 IST

दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही.

ठळक मुद्देलांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले.वनविभागाशी संपर्क साधावादोन दिवस गिधाडाची देखभाल

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात उष्मा वाढला असून, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेकडो फूट उंचीवरून विहार करणारा गिधाड जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने दुर्मिळ होत चाललेल्या एका गिधाडाचे प्राण वाचविण्यात वनविभाग व वन्यजीवप्रेमींना यश आले.दिंडोरी तालुक्यातील तळेगावजवळ एका शेतात पूर्ण वाढ झालेले लांब चोचीचे गिधाड उष्माघाताने कोसळले. सुदैवाने शेतात माती असल्यामुळे गिधाड जखमी झाले नाही. शेतकऱ्यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांना कळविली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली. तत्पूर्वी शहरामधील वन्यजीवप्रेमींसाठी कार्य करणा-या इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी वाडेकरांनी संपर्क साधत त्यांना बोलाविले. दरम्यान, फाउंडेशनचे अभिजित महाले, राहुल कुलकर्णी, दर्शन बनकर, शिवपुष्पजा कट्यारे यांनी घटनास्थळी पोहचून डिहायड्रेशन झालेले अत्यवस्थ गिधाड ताब्यात घेत तत्काळ गिधाडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे दीड ते दोन तास साधे पाणी, ग्लुकोजमिश्रित पाणी व नारळपाणी वन्यजीवप्रेमींनी गिधाडाला दिले. त्यानंतर गिधाडाला एकांतात मानवी संपर्कापासून लांब अंधाºया खोलीत ठेवले. दोन दिवस गिधाडाची देखभाल केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गिधाडाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी भरपूर खाद्य देण्यात आले. त्यानंतर तासाभराने गिधाडाला त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी शिवारातील डोंगररांगेमध्ये मुक्त करण्यात आले. अवघ्या काही सेकंदात शक्तिशाली गिधाडाने आकाशात भरारी घेत आपल्या विशिष्ट आवाजाने जणू त्याची शुश्रूषा करणाºयांना धन्यवादच दिले. अवघ्या दहा मिनिटांत या गिधाडाभोवती चार ते पाच गिधाडे आकाशात जमा झाली होती आणि ते सगळे डोंगरापलीकडे निघून गेल्याची माहिती महाले यांनी दिली.

वनविभागाशी संपर्क साधावाशहराच्या कमाल तपमानात वाढ झाल्याने शहर व परिसरात कुठल्याही ठिकाणी अत्यवस्थ अवस्थेत जर कुठलाही पक्षी आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वनविभागाशी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी केले आहे. वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास संभवण्याचा धोका असतो.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग