शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेस्क्यू : गंगापूररोडवरील गोदाकाठालगतच्या सोसायट्यांचे पहिले मजले बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:50 IST

गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देजवानांनी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू केलेसोसायट्यांमध्ये पावसाळी नाल्यांचे पाणी शिरले

नाशिक : गोदावरीचा महापूराचा फटका गंगापूररोडवरील रहिवाशांच्या सोसायट्यांना बसला आहे. येथील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी वाढले आहे. त्यामुळे या भागातील इमारतींमध्ये अडकलेल्या रहिवाशांना रेस्क्यू केले जात आहे.गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे.निर्मला कॉन्वेंट हायस्कूलजवळील रामजानकी संकुलाचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथे महापालिका आपत्ती विभागाचे पथक मदतीसाठी पोहचले आहे. रबरी बोटीच्या सहाय्याने रहिवाशांना बुडालेल्या इमारतीच्या मजल्यावरून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. तसेच सरकारवाडा, सराफ बाजार परिसरातदेखील पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे या भागातही काही लोक अडकले होते. त्यांनाही आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू केले. गंगापूररोडवरील लक्ष्मी विला, अशोका योग, कमलक्षी, जोशी बाग या सर्व सोसायट्यांमध्ये पावसाळी नाल्यांचे पाणी शिरले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीfloodपूरRainपाऊसNashikनाशिक