पेठ : शहरातील देशी दारू व बिअरबारच्या दुकानांना दिलेले ठराव तात्काळ रद्द करून परिसरातील उद्ध्वस्त होणारे संसार सावरावेत यासाठी पेठ गावातील रणरागिणी सरसावल्या असून, दिलेले परवाने रद्द न केल्यास दिवाळीनंतर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़ जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आदिंना निवेदन देण्यात आले़ निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या लता सातपुते, यमुना इंपाळ, हंसाबाई भोये, भारती दळवी, कुसुम भोये, रंजना दळवी, मीरा राऊत यांच्यासह परिसरातील शंभर महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत़
निवेदन : प्रसंगी आंदोलनाचीही तयारी
By admin | Updated: October 3, 2014 00:37 IST