शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लीकन जनशक्तीचा आघाडीला ११ जागांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:07 IST

उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आमची बांधीलकी असून, तशा विचारप्रणालीच्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लीकन आघाडीने दोन्ही कॉँग्रेस सोबत राहण्याचे ठरविले आहे

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : शनिवारचा महामेळावा पूरामुळे स्थगित कलम रद्द करण्यासाठी संविधानीक आधार देण्याची गरज होती

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : येत्या विधानसभा निवडणूकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये यासाठी पिपल्स रिपब्लीकन पक्ष आणि पिपल्स रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया यांची एकत्रित रिपब्लीकन जनशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडे अकरा जागांचा प्रस्ताव दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षीत असल्याची माहिती आघाडीचे संयोजक व पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दिली. नाशिकमध्ये येत्या १७ आॅगस्ट रोजी होणारा महामेळावा राज्यातील पूर परिस्थीतीमुळे स्थगित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रा. कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आमची बांधीलकी असून, तशा विचारप्रणालीच्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लीकन आघाडीने दोन्ही कॉँग्रेस सोबत राहण्याचे ठरविले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये हा त्यामागचा प्रयत्न आहे. या आघाडीत बहुजन वंचित आघाडी किंवा धर्मनिरपेक्ष विचारांचे आणखी कोणी आमच्या सोबत आले तर त्यांचे स्वागतच असेल. चळवळीतील सर्व नेत्यांनी अहंकार बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्रित आले पाहीजे. येत्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडीला ११ जागा मिळाव्यात असा प्रस्ताव कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय लवकरच बैठका घेण्यात येणार आहेत. काश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या विषयावर बोलताना प्रा. कवाडे यांनी, सदरचे कलम रद्द करण्यासाठी संविधानीक आधार देण्याची गरज होती. जम्मू -काश्मिरच्या राज्य सरकारने हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असता, तरी हे रद्द झाले असते. यापुर्वी केंद्रशासित प्रदेशाचे राज्य झाले आहे. परंतु एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेश होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक