शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रु ग्णाशी संपर्कात आलेल्या बाराही जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:14 IST

नांदगाव : तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बाराही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणेसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देनांदगाव : ग्रामस्थांसह यंत्रणा तणावमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बाराही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणेसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.खबरदारी म्हणून या बाराही जणांना सारताळे येथील ग्रामीण विकास संस्थेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पाच दिवसांपूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची एंट्री झाल्याच्या शक्यतेने ग्रामस्थांसह यंत्रणाही कमालीच्या तणावाखाली होती.आमोदे येथील एका ५८ वर्षीय पुरु षाची पाठ दुखत असल्याने त्याला चाळीसगाव व नंतर नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाशिकच्या रु ग्णालयात त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यामुळे सतर्कझालेल्या यंत्रणेने चाळीसगाव रु ग्णालयातील डॉक्टर्स-कर्मचारी अशा वीस जणांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे येथे पाठविले होते. ते निगेटिव्ह आले. दरम्यान रुग्णाची दोन्ही मुले व कुटुंबातील १० सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी दिली.आरोग्य विभागामार्फत सारताळे येथील ग्रामीण विकास संस्थेच्या इमारतीत शंभर रु ग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. आमोदे येथील उद्भवलेल्या आपत्कालीन घटनेत आमदार सुहास कांदे यांनी ग्रामस्थांसाठी सहकार्य केले.मालेगावी आणखी सात बाधित मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तपासणीसाठी पाठविलेल्या स्रावाच्या नमुन्यांपैकी आज पुन्हा ७ बाधित रुग्णाचे अहवाल आले. मालेगाव शहरातून जितक्या वेगाने बाधित कोरोनामुक्त म्हणून लोकांना घरी सोडण्यात येत आहे त्याच वेगाने पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांत घबराट पसरली आहे.सध्या असणारे लॉकडाउन आणि बाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे दहशतीत असणारे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असले तरी रुग्णाची संख्या कमी होत नसल्याने घबराट कायम आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्युदर साडेपाच टक्के असल्याचा दावा मनपा आरोग्य विभाग करीत असला तरी पुन्हा बाधित मिळून येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रविवारी आलेल्या अहवालात ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात सहा महिला आणि एका ३६ वर्षीय इसमाचा समावेश आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या