शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला सव्वालाख क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:42 IST

कळवण : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडा, अभोणा व कनाशी उपआवारात गतसप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. देशांतर्गत ...

ठळक मुद्देसर्वाधिक २३५० रुपये दर : सप्ताहात दरात किंचित सुधारणा

कळवण : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडा, अभोणा व कनाशी उपआवारात गतसप्ताहात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली. देशांतर्गत मागणी असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तूर्त तरी परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे. गत सप्ताहात १ लाख २१ हजार ३०० क्विंटल कांद्याची आवक होऊन प्रतिक्विंटलला सर्वाधिक २३५० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक रोज ९०० ते १००० ट्रॅक्टर इतकी राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमीच राहिली. कांद्याला मागणी असल्याने कांद्याचे दर किंचित वधारले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० ते ८०० रुपये, सरासरी १८०० ते २००० रुपये, तर सर्वाधिक २३५० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही कांद्याची आवक तशी जेमतेमच राहिली; पण मागणी टिकून होती. चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे कांदा आवक वाढत असल्याचे व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा दरातील चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हळूहळू आता देशासह विदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कांद्याची मागणी वाढत असल्याने कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या वर गेले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजार भाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.देशांतर्गत कांद्याची मागणी असल्याने कांद्याच्या बाजार भावावर कोणताही परिणाम तूर्त तरी होणार नाही. देशासह विदेशात कोरोनामुळे कांद्याची मागणी घटल्याने निर्यातीवर परिणाम झाला. दरवर्षी साधारणत: ३५ ते ३७ हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात परदेशात होते. यंदा मात्र फक्त १२ हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात परदेशात झाली आहे. देशासह विदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कांद्याची मागणी वाढत आहे.- हेमंत बोरसे, संचालक, कळवण बाजार समिती. 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड