शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपा आयुक्तांच्या विरोधात शासनाला रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:01 IST

नाशिक : पंधरा दिवसांपुर्वी कर वसुलीबाबत जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शासनाची थकीत असलेली वसुली देण्याचे आश्वासन देवूनही त्याची पुर्तता न करता उलट महसुल विभागाकडील मालमत्ता कर वसुलीच्या निमित्ताने मालेगावचे तहसिल व प्रांत कार्यालय सील करणा-या महापालिका आयुक्तांच्या विरोधात राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली असून, त्यासाठीचे पुरावे ...

ठळक मुद्देवसुली प्रकरण : शासकीय कामात अडथळा, नियमांचे उल्लंघनमालेगाव महापालिकेकडे शासनाचे जवळपास बारा कोटी रूपये थकीत

नाशिक : पंधरा दिवसांपुर्वी कर वसुलीबाबत जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शासनाची थकीत असलेली वसुली देण्याचे आश्वासन देवूनही त्याची पुर्तता न करता उलट महसुल विभागाकडील मालमत्ता कर वसुलीच्या निमित्ताने मालेगावचे तहसिल व प्रांत कार्यालय सील करणा-या महापालिका आयुक्तांच्या विरोधात राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली असून, त्यासाठीचे पुरावे व महत्वाची कागदपत्रे गोळा करण्याचे काम बुधवारी दिवसभर करण्यात आले. शासनाच्याच अंगीकृत असलेल्या दोन्ही खात्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासुन जुंपलेल्या लढाईने मात्र जनतेचे चांगलेच करमणूक झाले आहे.शासकीय जमिनींचे भाडेकरार व जमीनींच्या वाणिज्य वापराबाबत मालेगाव महापालिकेकडे शासनाचे जवळपास बारा कोटी रूपये थकीत असून, त्याच्या वसुलीसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. महालेखाकारांनी केलेल्या लेखापरिक्षणातही ही बाब वेळोवेळी निदर्शनास आणून देण्यात आल्याने रक्कम वसुलीसाठी १८ जानेवारी रोजी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक होऊन या बैठकीत मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी फेब्रुवारी अखेर पर्यंत एक कोटी रूपये भरण्याची तर गेल्या आठवड्यात ५० लाख रूपये देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्याची पुर्तता त्यांनी केली नाही, त्यामुळे मालेगावच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी दोन दिवसांपुर्वी वसुलीसाठी तगादा लावत मालेगाव महापालिकेचे दोन वाहने जप्त करत पालिकेचे बॅँक खातेही सिल केले. महसुल खात्याने केलेल्या या कारवाईमुळे महापालिकेनेही महसूल खात्याकडे थकीत असलेल्या मालमत्ता कराची माहिती गोळा केली व त्याच्या वसुलीसाठी काही दिवसांपुर्वीच तहसिल कार्यालयाला नोटीस बजावली होती. या नोटीसीची मुदत संपताच बुधवारी सकाळी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी थेट मालेगाव तहसिलदार कार्यालय व प्रांत कार्यालय ‘सील’करण्याची कार्र्यवाही केली. एवढ्यावरच आयुक्त थांबले नाहीत तर त्यांनी जुन्या तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या ‘लॉकअप’मधील कच्चे कैदी बाहेर काढण्याचे फर्मान सोडून त्यालाही सील ठोकण्याची तयारी चालविली. अवघ्या काही वेळात जलदगतीने घडलेल्या या घटनांमुळे महसूल खात्यातही धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांना याची माहिती देण्यात आल्यावर वेगाने चक्रे फिरली. महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यवाहीला अनुचित ठरवत महसूल खात्याने थेट पोलीस ठाणे गाठत शासकीय कामकाजात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक