शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कृउबामधील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 01:01 IST

जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांची मनपाच्या माध्यमातून मंगळवारपासून कोरोना चाचणी सुरू करण्यात आली. ३ दिवसांत २५०  बाजार समिती घटकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यात चौघेजण पॉझिटिव्ह आल्याने त्यांची रवानगी मेरी कोविड सेंटरला करण्यात आली आहे.

पंचवटी : जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांची मनपाच्या माध्यमातून मंगळवारपासून कोरोना चाचणी सुरू करण्यात आली. ३ दिवसांत २५०  बाजार समिती घटकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यात चौघेजण पॉझिटिव्ह आल्याने त्यांची रवानगी मेरी कोविड सेंटरला करण्यात आली आहे.बाजार समितीत येणाऱ्या घटकांची अडचण होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरच अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे.  बाजार समितीत नाशिक शहर जिल्हाभरातून पालेभाज्याची आवक होते. पंधरवड्यापूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यात बाजार समित्याही बंद ठेवल्या होत्या. सोमवारपासून निर्बंध शिथिल करत बाजार समिती सुरू करण्यात आली. बाजार समितीत होणारी गर्दी लक्षात घेऊन बाजार समिती व मनपाच्या माध्यमातून मंगळवारपासून अँटिजन चाचणी सुरू केली होती. त्यात अंदाजे २५० चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.बाजार समितीत शेतमाल आणावाबाजार समितीत नियम पालन करत लिलावाला परवानगी दिली आहे. काही शेतकरी बाजार समितीत न येता दिंडोरी रोड तर काही पेठ रोड बाजार समिती बाहेर रस्त्यावरच शेतमाल विक्री करतात. त्यामुळे बाजार समितीसमोर गर्दी वाढत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यावर शेतकऱ्यांचा माल कमी भावात विक्री होतो. शेतकऱ्यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार बाजार समितीत शेतमाल विक्री करत होणारी फसवणूक लूट थांबविण्याचे आवाहन सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीcorona virusकोरोना वायरस बातम्या