शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक रांगोळी कलेला नव्याने उजाळा : विसपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:17 IST

रांगोळी ही पारंपरिक कला ! प्राचीन कलेला आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रमदेखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटांची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे.

नाशिक : रांगोळी ही पारंपरिक कला ! प्राचीन कलेला आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रमदेखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटांची भव्य गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे. त्याची ‘वंडरबुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली असून विसपुते यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल विसपुते यांच्याशी केलेली ही बातचीत.रांगोळीसारख्या कलेतून विक्रमसाकारण्याची कल्पना कशी आली?मला शालेय जीवनापासूनच चित्रकला आणि रांगोळीची आवड आहे. चित्रकलेत मी जीडी आर्ट नाशिकच्या कलानिकेतनमध्ये करीत आहेत. चित्रकलेचे ज्ञान आहेच, परंतु रांगोळी माझी मीच शिकले. त्याच्या संयोगातूच रांगोळी रेखाटण्याचे काम काही वर्षांपासून करते आहे. रांगोळी ही प्राचीन कला असून तिचे पुनरुज्जीवन करण्याचे मी ठरवले आणि त्यामुळेच रांगोळीतूनच विक्रम करण्याचे ठरविले.गुढीची रांगोळी ही कल्पना कशीसुचली? काय परिश्रम घेतले?रांगोळी ही प्राचीन परंपरा आहे. तसेच गुढीपाढवा हा हिंदूंचा सण आहे. त्यामुळे यानिमित्ताने भव्य गुढीच साकारण्याचे मी ठरविले. ७५ फूट गुढी साकारणे सोपे नव्हते. ती साकारण्याचे ठरविल्यानंतर मी दररोज दोन तास रांगोळी काढण्याचा सराव केला. रांगोळी काढताना सतत वाकून रहावे लागणार असल्याने पाठ दुखणे किंवा हात दुखणे होणारच होते. त्यामुळे विशेष दक्षता म्हणून योगासनेही केली. माझी बहीण वसुधा जानोरकर हीने योगासने शिकवली. त्यानंतर हा विक्रम करण्याचे ठरवले.तुमच्या भव्य रांगोळीची विक्रमातनोंद झाली, त्याबद्दल काय भावना?रांगोळीसारख्या प्राचीन कलेच्या आधारे काही करू शकले याचा आनंद आहेच. परंतु हा विक्रम करण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन माझ्या कुटुंबीयांनी दिले. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हते. याशिवाय वृंदाताई लव्हाटे यांनी हॉलसाठी जे सहकार्य केले, त्यामुळेच हा विक्रम करू शकले. आता आणखी मोठा विक्रम करण्याची गिनीज बुकसह अन्य विक्रमांत नोंद करण्याची इच्छा आहे.भव्य रांगोळीचीविक्रमात नोंद झाली, त्याबद्दल काय भावना?रांगोळीसारख्या प्राचीन कलेच्या आधारे काही करू शकले याचा आनंद आहेच. परंतु हा विक्रम करण्यासाठी सर्वाधिक प्रोत्साहन माझ्या कुटुंबीयांनी दिले. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हते. याशिवाय वृंदाताई लव्हाटे यांनी हॉलसाठी जे सहकार्य केले, त्यामुळेच हा विक्रम करू शकले. आता आणखी मोठा विक्रम करण्याची गिनीज बुकसह अन्य विक्रमांत नोंद करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर रांगोळीचा प्रचार- प्रसारदेखील करणार आहे. पूर्वी घराबाहेर रांगोळी काढली जात असे. आता मात्र महिला नोकरदार झाल्या तसेच अन्य कारणांमुळे ही कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे रांगोळीचा प्रसारदेखील नजीकच्या काळात करणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक