नाशिक : अध्यक्षांपासून सर्वच पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांच्या बदल्या केल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असलेल्या दोघा स्वीय सहायकांच्याही तडकाफडकी त्यांच्या मूळ आस्थापनेवर बदल्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हंगामी स्वीय सहायक म्हणून सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी उत्तम चौरे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे हंगामी स्वीय सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बदली करण्यात आलेल्या दोघा स्वीय सहायकांपैकी एका सहायकाबाबत तक्रार आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दोन्ही स्वीय सहायकांच्या तडकाफडकी बदल्या केल्याचे समजते. नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर लगेचच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या सर्वच स्वीय सहायकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी त्यांच्या स्वीय सहायकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती करावी म्हणून सुखदेव बनकर यांना पत्र दिल्याने सचिन पाटील यांची उपाध्यक्षांच्या स्वीय सहायकपदी बदली करण्यात आली आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या सहायकांची बदली
By admin | Updated: October 2, 2014 00:17 IST