शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक- मुंबई महामार्गाची दुरुस्ती पूर्णत्वाकडे, दोन दिवसांत कामे पूर्ण होणार

By श्याम बागुल | Updated: August 11, 2023 16:41 IST

वाहतुकीचा वाचणार वेळ

श्याम बागुल, नाशिक: पावसाळ्यात मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला नाशिक ते मुंबईदरम्यान जागोजागी पडलेले खड्डे व त्यातून वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेता या महामार्गाच्या दुरुस्तीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक- मुंबई रस्त्याची डागडुजी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण महामार्ग खड्डेमुक्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

नाशिक- मुंबई रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. एवढेच नव्हे तर त्याचा फटका आमदार, खासदार, मंत्र्यांनाही वारंवार बसला. या विषयावर थेट पावसाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी चर्चा घडवून आणली होती. तर अलीकडेच नाशिकच्या उद्योजकांनी खड्ड्यांनी त्रस्त होत टोल न भरण्याची भूमिका घेतली हाेती. साडेतीन-चार तासाच्या अंतरावर असलेल्या मुंबईत पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत असल्याने ते टाळण्यासाठी अनेकांनी रेल्वेला पसंती दिली. मंत्री छगन भुजबळ यांनी तर रेल्वेनेच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांवर तातडीचा तोडगा काढण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांनी केली होती. यानुसार गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजीचे काम हाती घेतले होते.

टॅग्स :Nashikनाशिक