शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नांदूरशिंगोटे येथे सोमवार पासून रेणुकामाता यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 17:54 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास येत्या सोमवार (दि ७) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास येत्या सोमवार (दि ७) पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवसीय यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत असणारे श्री रेणुकामाता परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पौष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे सोमवारी यात्रेस प्रारंभ होणार आहे. यात्रा उत्सव समितीच्या वतीने मंदिर परिसरात सुशोभिकरण, सजावट आणि मंदिर संकुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर संकुलात रेणुकामाता, विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त महाराज, साईनाथ महाराज, श्रीराम, खंडेराव महाराज अशी सहा मंदिरे आहेत.यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी आठ वाजता मंदिराच्या पटांगणात कनात उभारली जाते. सकाळी ९ वाजता देवीला मंगलस्नान व अभिषेक घातला जातो. त्यानंतर हिरवे पातळ, हिरव्या बांगड्यांचा चुडा व नथ चढविली जाणार आहे. यावेळी रेणुका मातेची विधीवत पूजा करुन महाआरती होते. सायंकाळी गावातून कावड व देवीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणूकीत गावातील आबालवृध्दांसह तरुण मित्र मंडळ व महिला वर्ग सहभागी होतात.मिरवणुकीच्या शेवटी पुन्हा महाआरती करुन देवीचा मुखवटा दर्शनासाठी मंदिरात ठेवला जातो. देवीला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. यानंतर बाजारतळावर रात्री फटाक्यांची आतषबाजी व शोभेची दारु उडविली जाणार आहे. रात्री करमणुकीसाठी भीका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. ८) रोजी मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. यादिवशी दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गावातील व पंचक्रोशीतील महिला नवस फेडण्यासाठी लोटांगण, गळ खेळणे, प्रसाद वाटप करतात. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून यावेळी सुमारे तीन हजार रुपयांपर्यंत इनाम दिले जाणार आहे. याप्रसंगी नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.रात्री करमणुकीसाठी संगिता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. यात्रेच्या पूर्व संध्येला मिठाईवाले, खेळणीवाले, कटलरीवाले आदि दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे.चौकट - मंदीर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीतनाशिक - पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता हे जागृत देवस्थान आहे. तसेच परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ व यात्रा उत्सव असल्याने येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. यात्रा काळात सुरक्षतेच्यादृष्टीने मंदीर परिसरात तसेच रेणुका माता मंदीरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक