शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

चैत्र पौणिमेनिमित्त रेणुकादेवी यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:45 IST

येथील श्री रेणुकामातेचा चैत्रोत्सव शनिवारी (दि. ३१) संपन्न झाला. पहाटे ६ वाजता महाअभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम झाले. श्री रेणुकादेवीस वज्रलेप केल्याने मूर्तीचे आकर्षण वाढले असून, पुरातन स्वरूप दिल्याने मंदिराचा कायापालट झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

चांदवड : येथील श्री रेणुकामातेचा चैत्रोत्सव शनिवारी (दि. ३१) संपन्न झाला. पहाटे ६ वाजता महाअभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम झाले. श्री रेणुकादेवीस वज्रलेप केल्याने मूर्तीचे आकर्षण वाढले असून, पुरातन स्वरूप दिल्याने मंदिराचा कायापालट झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. आज हजारोभाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकचे नितीन चांदवडकर, मालेगावचे प्रदीप सोनार, मनमाडचे जगन्नाथ सांगळे यांच्या वतीने महाप्रसाद तर चांदवड येथील महावीर जैन सेवा केंद्र व तालुका शिवसेनाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या वतीने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. एकदिवसीय यात्रोत्सव काळात मिठाई, खेळणी, नारळ, प्रसाद यांची दुकाने थाटली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी आले होते. भाविक प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याचा नवस करतात व त्यासाठी नारळ फोडण्याचे मशीनदेखील आहे. रेणुकादेवी संस्थानने अनेक सुधारणा केल्या असून, त्यात सध्या देवीचा गाभारा उंच व देवी सर्वांना दिसावी असा पद्धतीने कामे झाली आहेत तर पुरातत्व विभागाचे वतीने मंदिर परिसरात बऱ्याच सुधारणा सुरू आहेत.  पुरातन काळातील असलेली दीपमाळ त्याच धर्तीवर नव्याने बनविली आहे. यात्रास्थळ विकास निधीतून भक्तनिवास, हॉल, स्त्रियांसाठी प्रसाधनगृह, वृद्ध व अपंग भाविकांसाठी विश्रामगृह नवरात्रात व गर्दीचे वेळेस भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून शिर्डीच्या धरतीवर स्टीलचे बॅरिकेटिंग बसविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक