शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:16 IST

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे.

ठळक मुद्देवारी चुकल्याची खंत : दोन महिने एकाच जागी बसून पूर्ण करणार संकल्प

जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा जीव कासावीस झाला. अशा स्थितीत पंढरपूरला दिंडी सोहळ्यात जाऊन येण्यासाठी जितका कालावधी लागतो तेवढ्या कालावधीत म्हणजे सुमारे दोन महिने एकाच जागेवर बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील विणेकरी एकनाथ महाराज रेंढे यांनी केला आहे. सध्या ते येवला तालुक्यातील कानडी येथे नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून एक महिन्यापासून आपला संकल्प पूर्ण करत आहेत.दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शेलार, दिंडी मालक नारायण महाराज काळे, सुभाष महाराज बोराडे, वसंत महाराज शेळके, विष्णू महाराज लंके, अगस्ती महाराज, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष शंतनू महाराज पवार, जनार्दन महाराज शेळके यांच्याकडे रेंढे यांनी एकाच जागी बसून हरिनाम जप करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र वयाचा विचार करता असे न करण्याचा सल्ला सर्वांनी दिला, मात्र रेंढे त्यावर ठाम राहिल्याने त्यांना कानडी येथील नारायण महाराज काळे यांच्या शेतात तंबू ठोकून देण्यात आला.पिंपळगाव लेप पंचकमिटी भजनी मंडळ पिंपळगाव लेप व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरात विणापूजन संतपूजन करून पिंपळगाव लेप ते कानडीपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन करत दिंडी काढली. तंबूला भगव्या पताकांनी सजवत कानडी ग्रामस्थांनी एकनाथ महाराज रेंढे यांच्याकडे वीणा सोपवली. गेल्या एक महिन्यापासून रेंढे महाराज यांचे विणावादन अखंडपणे सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या नियमाप्रमाणे तंबूत राहात हरिनामाचा जप, पहाटेची काकड आरती कानडी ग्रामस्थांच्या सहकार्याने नियमितपणे सुरू असून, येत्या १० ऑगस्टपर्यंत जप चालणार आहे.बालपणापासून म्हणजे सुमारे ४५ वर्षांपासून मी विणेकरी म्हणून दरवर्षी अखंडपणे पालखी सोहळ्यात जात असतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे पालखी सोहळ्याची परंपरा खंडित झाल्याने मी एकाच ठिकाणी बसून हरिनामाचा जप करण्याचा संकल्प केला आहे. पुढील वर्षी तरी दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू होऊन विठुरायाच्या दर्शनाला जाता यावे असे मागणं परमेश्वर चरणी घातले आहे.- एकनाथ महाराज रेंढे, विणेकरी, पिंपळगाव लेप 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीSocialसामाजिक