शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनवरील शासन निर्बंध हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 01:31 IST

कोरोना रूग्णांची घटलेली संख्या पाहता, या इंजेक्शनचा साठा व वाटपाबाबत असलेले शासकीय निर्बंध उठविण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे औषधी दुकानातून पूर्वीच्याच खुल्या पद्धतीने त्याची खरेदी-विक्री केली जाणार आहे.

नाशिक : कोरोना रूग्णांची घटलेली संख्या पाहता, या इंजेक्शनचा साठा व वाटपाबाबत असलेले शासकीय निर्बंध उठविण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे औषधी दुकानातून पूर्वीच्याच खुल्या पद्धतीने त्याची खरेदी-विक्री केली जाणार आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रूग्ण संख्या वाढीस लागली होती. कोरोनावर प्रभावी उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत झाल्यामुळे प्रत्येक रुग्णांसाठी रेमडेसिविरचे चार ते सहा डोस देण्यात येत होते. त्यामुळे रूग्ण संख्येच्या तुलनेत रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने व त्यातच या इंजेक्शनची अचानक मागणी वाढल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला होता. 

रुग्णांचे नातेवाईक औषधी दुकानांसमोर दहा ते बारा तास रांगेत गर्दी करून उभे राहात असल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले होते. तीन ते साडेतीन हजार रुपयांचे इंजेक्शन दहा ते बारा हजार रुपयात विक्री केली जात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने या इंजेक्शनची खरेदी, साठा व विक्री बाबतचे अधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना देऊन गैरप्रकाराला आळा घालण्याचा निर्णय घेतला व त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दररोज उपलब्ध साठ्यानुसार इंजेक्शनचे वाटप केले गेले. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या घटली त्याचबरोबर रेमडेसिविर इंजेक्शनच्या अति वापरामुळे त्याचे दुष्परिणामाच्या तक्रारी त्याचबरोबर सदर इंजेक्शनच्या उपयोगितेबाबत वैद्यकीय क्षेत्रातच भिन्न मतप्रवाह व्यक्त करण्यात आल्याने रेमडेसिविरच्या वापरावर आपोआपच मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिलेले इंजेक्शनचा साठा औषधी दुकानांमध्ये तसाच पडून राहिला. परिणामी सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा राज्यात उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे म्हणणे असून, त्यामुळे त्याच्या वितरणावरील निर्बंध ठेवण्याची गरज नसल्याच्या निष्कर्षाप्रत विभाग पोहोचला आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा साठा व वितरणासाठी शासकीय अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार आता रद्द करण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारmedicineऔषधंremdesivirरेमडेसिवीर