शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी खुनातील संशयितांची काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:43 IST

म्हसरूळ (बोरगड) एकतानगर येथे राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी (२५) या युवकाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून खून करणारे संशयित विजयकुमार पुंडलिक गांगोडे (२४), मयूर राजाभाऊ जाधव (२३) व हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (२४) या तिघांची म्हसरूळ पोलिसांनी सोमवारी (दि.१२) सायंकाळी बोरगड परिसरातून धिंड काढली. या तिघांना रविवारी (दि.१०) पोलिसांनी अटक केली होती.

पंचवटी : म्हसरूळ (बोरगड) एकतानगर येथे राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी (२५) या युवकाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून खून करणारे संशयित विजयकुमार पुंडलिक गांगोडे (२४), मयूर राजाभाऊ जाधव (२३) व हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (२४) या तिघांची म्हसरूळ पोलिसांनी सोमवारी (दि.१२) सायंकाळी बोरगड परिसरातून धिंड काढली. या तिघांना रविवारी (दि.१०) पोलिसांनी अटक केली होती.  एकतानगर साती आसरा मंदिराजवळ बाकड्यावर बसलेल्या परदेशी याच्या डोक्यात दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी गोळी झाडून खून केल्याची घटना गत बुधवारी (दि.६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर संशयित पसार झाल्याने एकतानगर परिसर हादरले होते. म्हसरूळ पोलिसांनी परदेशी याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून खून केल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली असली तरी संशयितांनी परदेशी याचा खून का केला याचे मुख्य कारण गुलदस्त्यात आहे. मात्र,पूर्ववैमनस्यातून ही घटना  घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.  नितीन परदेशी याच्यावर संशयितांनी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडल्याने परदेशी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची परिसरातील दहशत कमी व्हावी तसेच संशयितांबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती दूर व्हावी यासाठी सायंकाळी म्हसरूळ, बोरगड, एकतानगर परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. गेल्या काही दिवसापासून शहरात दहशत पसरविणाºया संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरातून त्यांची धिंड काढली जात आहे. परिसरामध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारी सूत्र हलविणाºया गुंडांचा वचक कमी व्हावा यासाठी संशयित ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून धिंड काढली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा