शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:17 IST

: श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

नाशिक : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.जुन्या आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात येत्या शुक्रवारी (दि.१९) हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महंत भक्तिचरणदास महाराज यांनी दिली आहे. पंचवटीतील जुना आडगाव नाका येथे प्रसिद्ध व प्राचीन श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्र वारी पहाटेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न होतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जन्मोत्सवनिमित्त शुक्रवारी पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ६ वाजता आरती, सकाळी ७ वाजता सामुदायिक हनुमान चालीसा पठण, सकाळी १० वाजता सुंदरकांड हवन, दुपारी १२ वाजता आरती, सकाळच्या आरतीनंतर दिवसभर लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.नरसिंहनगर, गंगापूररोड येथील नसती उठाठेव मित्रपरिवारातर्फे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्याने होत असून, शुक्रवारी सकाळी ६.२७ वाजता जन्मोत्सव सोहळा होणार आहे. नंदिनी गोशाळा आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पूर्णाहुती व आरती संपन्न होणार आहे. तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.श्री सिद्ध हनुमान देवस्थान श्रीक्षेत्र अंजनेरी येथे सकाळी ६.१५ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. तसेच महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.  मुंबईनाका येथील श्री पवनपुत्र हनुमान बहुउद्देशीय सेवाभावी मंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़चौक मंडई, वझरेरोड, फुलमाळी मंच ट्रस्ट, दक्षिणमुखी हनुमान मंदिर जन्मोत्सवासाठी सज्ज झाले आहे. शुक्रवारी सकाळी जन्मोत्सव सोहळ्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या मंदिराला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. प्रत्येक वर्षी हनुमानजयंतीला मूर्तीस सोन्या-चांदीचे दागिने व हिरेजडीत रत्नांनी सजविले जाते. जन्मोत्सवासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती फुलमाळी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक वझरे यांनी दिली.समर्थ रामदास स्वामी मठ टाकळीहनुमान जयंतीनिमित्त श्री समर्थ रामदास स्वामी मठ टाकळी येथे शुक्रवारी (दि. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.१९ वाजता जन्मोत्सव, दुपारी ११.४५ पर्यंत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी महाआरती, भंडारा, भजन सेवा व भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एस. टी. पांडे, विश्वस्त सुधीर शिरवाडकर आदींनी केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक