शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाणगंगा काठच्या गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:53 IST

गंगापूर धरणातून आवर्तन : शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर

ठळक मुद्दे बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई वर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे तर शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.बाणगंगा काठावरील दिक्षी ,दात्याणे, जिव्हाळे, ओणे, थेरगाव, कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या सर्व गावांचा पाणीपुरवठा हा बाणगंगेच्या काठावर असलेल्या विहीरींवर आधारित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाणगंगा कोरडी ठाक पडल्याने बाणगंगा काठच्या सात गावांतील शेती ,जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. द्राक्षबागा ,फुलशेती कोमजली असून जनावरांचेही पाण्यासाठी हाल होत आहे. पाण्यासाठी नागरीक दररोज भटकंती करीत आहे. टंचाईची गंभीर परिस्थितीची पाहणी करून आमदार अनिल कदम यांनी कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार रविवार (दि.२)पासून गंगापूर धरणातून डाव्या कालव्यातून बाणगंगेला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. सोमवारी दुपारपर्यंत पाणी दात्याने बंधा-यापर्यंत पोहचले होते. बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी