शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनसागर, चणकापूरमधून सोडले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 18:41 IST

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या महिन्याभरापासून बहुसंख्य गावातील विहिरींनी गाठलेला तळ यामुळे परिसरातील पाणीयोजना कोरड्या पडल्या असून अर्जुनसागर (पुनद) व चणकापूरच्या या आवर्तनाने पाणी योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे. कसमादे परिसरातून पाण्याची वाढलेली मागणी व पदाधिकारी आणि नागरिकांनी आमदार नितीन पवार यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.आमदार पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी टंचाई लक्षात आणून देत कसमादेतील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन अर्जुनसागर धरणात शिल्लक असलेल्या ९५० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात सोडावे व चणकापूर धरणात शिल्लक असलेल्या १४५० दशलक्ष घनफूट साठ्यापैकी या आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात ८ ते १० दिवसात ११०० क्युसेसने ४५० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केल्याने जिल्हाधिकारी यांनी अर्जुनसागर व चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले.ऊन वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे कसमादेच्या चारही तालुक्यांना अर्जुनसागर व चणकापूर धरणाच्या आवर्तनाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. यामुळे यावर्षी पाण्याला अनन्यसाधारण महत्व आले असून पाणी आवर्तन सुरू असेपर्यंत अवैध वीजपंप चालवून कुणी पाणी उपसा करू नये म्हणून नदीकाठच्या या गावांमध्ये ८ ते १० तास भारनियमन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास