शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

विविध वयोगटातील  २० बालकामगारांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:11 AM

वेगाने विकसित होत जाणाऱ्या नाशिक शहरात बालमजुरीची समस्याही पाहायला मिळत आहे. बालमजुरांची सुटका करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांचे बालपण उपभोगण्याची संधी देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणा-या ‘चाइल्ड लाइन’ संस्थेला २०१७-१८ या वर्षात विविध वयोगटातील आणि देशभरातील २० बालकांची सुटका करण्यात यश आले आहे.

नाशिक : वेगाने विकसित होत जाणाऱ्या नाशिक शहरात बालमजुरीची समस्याही पाहायला मिळत आहे. बालमजुरांची सुटका करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांचे बालपण उपभोगण्याची संधी देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणा-या ‘चाइल्ड लाइन’ संस्थेला २०१७-१८ या वर्षात विविध वयोगटातील आणि देशभरातील २० बालकांची सुटका करण्यात यश आले आहे. २०१४-१५ मध्ये सुवर्णकामासाठी दक्षिण भारतातून नाशकात आलेल्या ५७ बालमजुरांची सुटका करण्यात आली होती. येणाºया तक्रारींची दखल घेत जिल्हाभरातील बालमजुरांची सुटका, बालमजुरी कायद्याविषयी लोकांचे प्रबोधन करणे आदी कामे केली जात असून, गेल्या काही वर्षांत बालमजुरीचे प्रमाण आटोक्यात आणण्यात संस्थेला यश येत आहे. यासाठी समाजशास्त्र महाविद्यालय, नवजीवन वर्ल्ड पीस अ‍ॅँड रिसर्च फाउंडेशन, चाइल्ड लाइन या संस्थांअंतर्गत प्रा. विलास देशमुख, प्रणिता तपकिरे, महेंद्र विंचूरकर, प्रवीण अहेर, सुवर्णा वाघ, निखिल पाटील, शीतल वडनेरकर, दीपक शिंदे, विजया शिंदे, दमयंती बावनकुळे, अतुल डांगळे, त्रिशरण वनीस आदी व्यक्ती व संस्था कार्यरत आहेत....अन् बालकांची झाली सुटकामूळ पश्चिम बंगाल येथील आणि आईवडिलांनी पैशांच्या बदल्यात ओझर येथे एका घरी कामाला ठेवलेल्या मुलीने टीव्हीवरील चाइल्ड लाइनची जाहिरात पाहून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपली स्थिती सांगितली. नाशिक चाइल्ड लाइनचे कार्यकर्ते तत्काळ तेथे पोहोचले व तिची सुटका केली. तिचे पालक आल्यानंतर त्यांचे समुपदेशन करीत, त्यांना समज देत मुलीला पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ घरी पाठविण्यात आले. पश्चिम बंगालमधील चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनीही तिच्या केसचा पाठपुरावा करत तिचे संगोपन व्यवस्थित होत आहे ना याची वेळोवेळी चाचपणी केली. आज मुलगी व्यवस्थित शिकते आहे.तक्रारीनंतर मुलीची सुटकाएका उच्चभ्रू मुलीला तिच्या आईवडिलांनी त्यांचेच नातेवाईक असणाºया नाशिकच्या कुटुंबात पाठवून दिले. मुलीला शिकवू, चांगले संस्कार करू असे आश्वासन दिल्याने आणि नातेवाईकच असल्याने पालकांनीही आनंदाने पाठविले. प्रत्यक्षात मुलीला त्या नातेवाईकांनी आपल्या चिमुकल्या बाळाला सांभाळण्याचे काम दिले. नातेवाईक दोघेही नोकरीसाठी सकाळी १० वाजता बाहेर पडत व सायंकाळी ६ वाजता घरी येत. तोपर्यंत घराला बाहेरून कुलूप लावले जात होते. चाइल्ड लाइनला आलेल्या तक्रारीनंतर मुलीची सुटका करण्यात आली.मुलाची सुटकादक्षिण भारतातील एका लहानग्या मुलाला त्याच्या नातेवाईकाने नाशिकला आणले होते. या नातवाईकाने लग्नात आर्थिक मदत केली होती. त्याच्या बदल्यात त्याला नाशिकला आणून इडल्या विकण्याच्या कामात गुंतवण्यात आले. मुलाला दररोज १५० रुपयांच्या इडल्या विकल्या तरच खायला मिळत होते. त्याची केस कळताच त्याच्या भाषेची व्यक्ती शोधत व सत्य परिस्थिती जाणून घेत त्याची सुटका करण्यात आली.मातेने सोडले वाºयावरएका छोट्या मुलीच्या आईने आपल्या मुलीला बेवारस सोडून ती प्रियकराबरोबर निघून गेली. त्या व्यक्तीने मुलीला घराच्या अंगणातील कोपºयात आसरा दिला; पण तिला खायला, प्यायलाही काही दिले जात नव्हते. तिच्याकडून घरकामे मात्र करून घेतली जात होती. तिची केस समजल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. आज ती मुलगी आधाराश्रमात राहून शिक्षण पूर्ण करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक