शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कडक निर्बंधांतून रात्री बारा वाजेनंतर शिथिलता ; जिल्ह्यातील उद्योगांसह व्यापारचक्रही होणार पुन्हा गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 16:39 IST

नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात येणार असून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसह व्यापार, व्यावसायही राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अटींसह सुरू होणार असल्याने सोमवार (दि.२४) जिल्ह्यातील व्यापार उद्योगाची चक्रे पुन्हा गतीमान होणार आहे.

ठळक मुद्देकडक निर्बंधांतून रात्री बारावाजेनंतर शिथिलता उद्योगांसह व्यापारचक्रही पुन्हा होणार गतीमानकोरोना नियमांचे पालन अनिवार्य ; राज्याचे नियम सुरू राहणार

नाशिक : जिल्ह्यात १२ ते २३ मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात येणार असून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसह व्यापार, व्यावसायही राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अटींसह सुरू होणार असल्याने सोमवार (दि.२४) जिल्ह्यातील व्यापार उद्योगाची चक्रे पुन्हा गतीमान होणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवार (दि.२४) पासून उद्योगांची चाके पुन्हा एकदा फिरु लागणार असून कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कामगारांनी आपापल्या पाळीत कामावर हजर राहण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाकडून दिल्या जात आहेत. कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने दि.१२ ते २२ मे दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापार, व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले होते. लॉकडाऊनमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने, अन्न प्रक्रिया आणि फर्मास्युटिकल उद्योगांसह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या होत्या. शिवाय ज्या उद्योजकांना उद्योग सुरु ठेवायचे असतील त्यांनी कारखान्यात अथवा दोन किलोमीटर अंतरावर कामगारांच्या निवासाची आणि येण्याजण्याची सोय केल्यास त्यांना उद्योग सुरु ठेवता येईल असे स्पष्ट आदेश बजावण्यात आलेले होते. त्यानुसार महिंद्रा अँड महिंद्र, टीडीके इपकोस, पांचाल इंजिनिअर्स यासह बहुतांश कारखान्यांनी या निर्देशाचे पालन करीत उत्पादन सुरु ठेवले होते. तर अन्न प्रक्रिया आणि फर्मास्युटिकल आणि अत्यावश्यक सेवेतील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु होते. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना जिल्ह्यातील उद्योग पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकरणार आहे.

 जिल्ह्यातील उद्योग पूर्ववतनाशिक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे १२ हजार ८०० उद्योग आहेत. त्यापैकी ३४५१ (२५ टक्के) उद्योग आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार सुरु होते. मात्र, रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंत लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर सोमवारपासून कोविड-१९ च्या नियमांचे पालन करुन उद्योग सुरु करण्यास जिल्हा व्यवस्थापनाने परवानगी दिल्याने बहूतांश सर्वच उद्योग सुरू होऊ शकणार आहेत.

हमीपत्राची अट शिथिल सुरुवातीला उद्योगांनी हमीपत्र द्यावे अशी अट घालण्यात आली होती. परंतु औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी हरकत घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही अट शिथिल केली आहे. त्यामुळे आता उद्योग पूर्ववत सुरु करण्यास कोणतीही अडचण राहिलेली नसल्याने सोमवारपासून उद्योगांची चाके पुन्हा गतिमान होणार आहेत. त्यादृष्ट्रीने वेगवेगळ्या कंपनी व्यवस्थापनांकडून कामगारांना सूचित करुन आपापल्या शिफ्टमध्ये कामावर येण्यास सांगितले जात आहे.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या