शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रशासनावर पुन्हा जप्तीची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:46 IST

सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्यासाठी एक ते सहा योजनांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने भुसंपादित केलेल्या जमिनी या अल्पदरात घेतल्या असल्याच्या कारणाने प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. शासनाने मंजूर केलेली भरपाई रक्कम ही अत्यंत कमी असल्याने प्रकल्पग्रस्तांना यांचा वाढील मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही प्रशासनाने ते दिले नसल्याने न्यायालयाने प्रशासनाविरुद्ध जप्तीचे आदेश दिले आहे. यामुळे सिडकोवर नुकसानभरपाई न केल्याच्या कारणावरून दुसऱ्यांदा जप्तीची नामुष्की ओढविली असून, येत्या दोन दिवसांतच जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला न दिल्याने न्यायालयाचा दणका

सिडको : सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्यासाठी एक ते सहा योजनांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने भुसंपादित केलेल्या जमिनी या अल्पदरात घेतल्या असल्याच्या कारणाने प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. शासनाने मंजूर केलेली भरपाई रक्कम ही अत्यंत कमी असल्याने प्रकल्पग्रस्तांना यांचा वाढील मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही प्रशासनाने ते दिले नसल्याने न्यायालयाने प्रशासनाविरुद्ध जप्तीचे आदेश दिले आहे. यामुळे सिडकोवर नुकसानभरपाई न केल्याच्या कारणावरून दुसऱ्यांदा जप्तीची नामुष्की ओढविली असून, येत्या दोन दिवसांतच जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.सिडको प्रशासनाने घर बांधणीचा प्रकल्प उभारण्यासाठी मोरवाडी येथील शेतकºयांच्या जमिनी व प्लॉट गेल्या १९८२ साली शासनाकडून संपादित केल्या आहेत. त्याबाबत संपादनाचा निवाड हा सन १९८६ साली जाहीर करण्यात आला व अतिअल्प नुकसानभरपाई भूधारकांना मंजूर करण्यात आल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आला आहे. शासनाने मंजूर केलेली भरपाई अत्यंत कमी असल्याकारणाने संबंधित ५९ भूधारकांनी नाशिक जिल्हा न्यायालयात वाढीव नुकसानभरपाई मिळावी यासाठी दावे दाखल केले होते. जिल्हा न्यायालयाने सन १९९४ साली सदर ५९ दाव्यांचा निकाल देऊन भूधारकांच्या लाभात वाढीव दराने नुक सानभरपाई मंजूर केली. यांनतर १९९६ साली पुन्हा सर्व ५९ प्रकल्पग्रस्त अपिलात जाऊन जमिनीचा दर अजून वाढून मागितले.याचा निकाल १९९७ साली भूधारकांच्या बाजूने लागला असून, त्यांना उच्च न्यायालयाने संपादित केलेला दर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या दरापेक्षा दुप्पट मंजूर केला. यावर सिडको प्रशासनाने २००६ साली याचिका दाखल केली होती. परंतु त्याचा निकाल २०१७ साली भूधारकांच्या बाजूने लागला व सिडको प्रशासनाने मंजूर करण्यात आलेली रक्कम तत्काळ देण्याचे आदेश दिले आहे.न्यायाालयाच्या आदेशानुसार ५९ भूधारकांना एकूण एक कोटी ६१ लाख रुपयाची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देऊनही त्यांनी रक्कम भरली नाही.सिडको प्रशासनाने न्यायालयाचे आदेश देऊनही रक्कम न भरल्याने प्रशासनाविरुद्ध न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले आहेत.भूधारकांच्या वतीने उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात अ‍ॅड. अनिल जे. अहुजा यांनी काम पाहिले. ५९ भूधारकांमध्ये नाना महाले, लक्ष्मण जावभावे,उत्तमराव महाले, शेवंतीलाल शहा,अब्दुल काजी त्र्यंबक सोनवणे, गंगुबाई बदादे, पांडूरंग वरोडे व इतर शेतकºयांचा समावेश आहे.

टॅग्स :cidcoसिडकोCourtन्यायालयOrder orderआदेश केणे