शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात कामगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:21 IST

बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर पोलीस बंदोबस्तात नाव नोंदणी करावी लागली.

सातपूर : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर पोलीस बंदोबस्तात नाव नोंदणी करावी लागली.  राज्य सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी बांधकाम कामगार मंडळाची स्थापना केली असून, या मंडळाच्या माध्यमातून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे. बहुतांश मजुरांनी नोंदणी केली नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. आठवड्यातून एक दिवस नोंदणी केली जात असल्याने बुधवारी सकाळपासून बांधकाम मजुरांनी मोठी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने कामगार एकाच ठिकाणी जमा झाल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कामगारांनी एकच गोंधळ केल्याने अखेर पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी शांतता प्रस्थापित केल्यानंतर कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास झांबरे, ललित दाभाडे, विशाल जोशी, आर.जी. लाडे, पी.पी. जाधव, वैभव अहिरे, सोमनाथ बनसोडे आदींनी कामगारांची नोंदणी केली. रात्री उशिरापर्यंत नोंदणीचे काम सुरू होते. जिल्ह्यात यापूर्वी सुमारे २५ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. बुधवारी जवळपास दीड हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली. यात महिला कामगारांची संख्या मोठी होती. नोंदणीसाठी आलेल्या कामगारांनी घरूनच जेवणाचा डबा सोबत आणला होता.वर्षातून ९० दिवस काम केल्याचे नोंदणीकृत बांधकाम ठेकेदाराचे किंवा ग्रामसेवक अथवा मुख्याधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, १८ ते ६० वर्ष वय असावे अशा बांधकाम मजुरांची नोंदणी केली जात आहे. नोंदणी शुल्क २५ रुपये आणि पाच वर्षांचे सभासद शुल्क ६० रुपये असे ८५ रुपये घेतले जात आहेत. केवळ नूतनीकरणासाठी ६० रुपये आकारले जातात. आठवड्यातून एक दिवस नोंदणीसाठी ठेवण्यात आली आहे. पूर्वी जनजागृती करूनही नोंदणी केली जात नव्हती. आता लाभ मिळू लागल्याने नोंदणीसाठी गर्दी वाढू लागली आहे.- गुलाबराव दाभाडे, कामगार उपायुक्त

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस