शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षनिर्यातीसाठी साडेतीन हजार प्लॉटची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:53 IST

युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या प्रक्रि येअंतर्गत यावर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २२९५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबांगांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्दे३१ डिसेंबरपर्यंत मुदत : तालुका अधिकारी, कृषी सहायक यांच्याकडे नोंदणीची सुविधा

नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या प्रक्रि येअंतर्गत यावर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २२९५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबांगांची नोंदणी पूर्ण झाली आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अद्याप द्राक्षबागांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही द्राक्षबांगांची नोंदणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे.निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे द्राक्ष बागांची नोंदणी आवश्यकअसून, यावर्षी १५ आॅक्टोबरपासून या प्रक्रियाला सुरुवात झालीआहे. या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे ३हजार ४९९ प्लॉटची नोंदणी झाली आहे.गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ३० हजार ४२७ प्लॉट इतके होते. त्यातुलनेत यावर्षी नोंदणी करणाºया उत्पादकांनी संख्या कमी असली तरी डिसेंबरपर्यंत हे प्रमाण वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाला असून यावर्षी शेतकºयांना ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्षनिर्यातीसाठी त्यांच्या प्लॉटची नोंदणी करता येणारआहे.गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्णातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती.याच प्रमाणात यावर्षीही निर्यातीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २६ ते २७ हजार प्लॉटची नोंदणी होणे आवश्यकअसून, शेतकºयांनी ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्ष प्लॉटची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ यांनी केले आहे.अशी करता येईल प्लॉट नोंदणी द्राक्ष उत्पादक शेतकºयांना त्यांच्या बागेतील द्राक्षांची निर्यात करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील कृषी सहायक यांच्याकडे प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांना द्राक्षबागेचा सातबारा व खाते उतारा व प्रत्येक प्लॉटसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी