शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाकरीता संस्थांना २२ मे पर्यंत नोंदणीची मूदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 15:01 IST

राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालये व शिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी महाविद्यालये अथवा संस्था प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्यास व आवश्यक कागदपत्रांची माहिती सादर करणार नाहीत, अशी महाविद्यालये व संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून करण्यात आल्या आहेत. 

नाशिक : राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालयेशिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी महाविद्यालये अथवा संस्था प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्यास व आवश्यक कागदपत्रांची माहिती सादर करणार नाहीत, अशी महाविद्यालये व संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून करण्यात आल्या आहेत.  राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित, महापालिका, अल्पसंख्याक, आरोग्य विज्ञान, तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण, कलाशिक्षण, पशू व मत्स्य विज्ञान शिक्षण या कार्यक्रमांच्या महाविद्यालयांना व संस्थांना प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव तथा राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षाचे आयुक्त ए. ए. रायते व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे अशा सर्व महाविद्यालये व संस्थांना २२ एप्रिल ते २२ मे या कालावधीत महाविद्यालय व अभ्यासक्रमांची नोंदणीप्रक्रिया पूर्ण करून (परिशिष्ट-अ) आवश्यक ते कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक असून, जी महाविद्यालये अथवा संस्था प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्यास व आवश्यक कागदपत्र माहिती सादर करणार नाही, अशी महाविद्यालये व संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून करण्यात आल्या आहेत. खासगी-विनाअनुदानितसाठी परिशिष्ट-बराज्यातील खासगी अथवा विनाअनुदानित महाविद्यालयांनाही २२ मे पर्यंत आॅनलाइन नोंदणी करावी लागणार असून, या महाविद्यालयांना ‘परिशिष्ट-ब’नुसार आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार असल्याची सूचनाही प्रवेश नियामक प्राधिकरण सचिव रायते यांनी केली आहे. महाविद्यालये व संस्थांना नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक परिशिष्ट-अ व परिशिष्ट प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय