शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे उद्यापासून लेखणीबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:04 IST

सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. ...

ठळक मुद्देविभागातील कर्मचा-यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही.

सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. मात्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने उद्या गुरुवारपासून (दि.1) बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.नोंदणी व मुद्र्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करणे, कोरोना महामारी मध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 30% उपस्थितीचे आदेश असताना 100 % उपस्थितीमध्ये काम करत आहेत तथापि विभागातील कर्मचा-यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये (कोवीड-19) या आजाराने ंआत्तापर्यंत 06 अधिकारी व कर्मचार्‍यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना विमाकवच द्यावे, तुकडेबंदी कायद्याने होणार्‍या कारवाया, रेरा कायद्यामध्ये होणार्‍या कार्यवाही, सह दुय्यम निबंधक वर्ग -2 व दुय्यम निबंधक श्रेणी -1 संवर्गाचे एकत्रीकरण करणेबाबत, हार्डवेअर साहीत्य बाबत, आयकर विवरणपत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी केल्या जाणार्‍या माहिती बाबत, आय-सरीता, ई-म्युटेशन, ग्रास व आधार सर्व्हर इत्यादी मागण्याबाबत तसेच शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सहसचिव सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापुर्वीच घोषीत केल्याप्रमाणे गुरुवारपासून पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे. पत्रकावर संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार संस्थापक सल्लागार गोपीनाथराव कोळेकर, उपाध्यक्ष संतोष तायडे, सुधाकर निमजे, अनिल देशमुख, सुनिल वाडेवाले, अर्जुन वडये, अर्जुन वडये, राजेंद्र डोईफोडे, सुनिल पवार देवा चव्हाण, कल्याण कुलकर्णी, अनिल जगधने,संध्या रामटेके आदींची नावे आहेत.

 

टॅग्स :GovernmentसरकारRegistrarकुलसचिव