शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या उद्योजकांना हवे विभागीय धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:18 IST

राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे.

नाशिक : राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे.राज्य सरकारचे अगोदरचे औद्योगिक धोरण संपून आता नवे धोरण आखले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत याबाबत मागणी होत असून, यासंदर्भात शासनाला शिष्टमंडळ भेटणार आहे. यापूर्वीच्या शासकीय औद्योगिक धोरणानंतरही शासनाकडून विविध विभागांना सवलती देण्यात आल्या. विशेषत: दोन ते तीन वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भावर मेहरनजर दाखवित राज्य शासनाने तेथील उद्योग क्षेत्रासाठी वीजदर कमी केले; मात्र अशाप्रकारची सवलत नाशिक विभागाला म्हणजे उत्तर महाराष्टÑाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे उद्योजकांवर अन्याय झाल्याची भावना होती. नाशिकमध्ये तर राजकीय पक्षांनी त्याच्या विरोधात मोर्चेही काढले होते. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक विभागाला सवलत दिली असली तरी त्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक विभागाचे वैशिष्ट्य, तेथील हवामान आणि पीक पद्धती या सर्वांचा विचार करून प्रादेशिक स्तरावरच धोरण आखावे, अशी नाशिकच्या उद्योग क्षेत्राची मागणी आहे. उद्योगमंत्र्यांकडे अशी मागणी करण्यात आली असली तरी शासनाचीदेखील भेट घेऊन तशी मागणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक