शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फ क्लबची माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:35 IST

गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले.

नाशिक : गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले. विशेष म्हणजे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्याची दखल घेऊन शहर अभियंत्यांना माहिती घेऊन पाठवतो असे सांगितले खरे, परंतु नंतर अभियंता घुगे यांनी जाणे टाळले. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी आता येत्या महासभेत जाब विचारण्यात येईल, अशी भूमिका घेतली.गोल्फ क्लबचे नूतनीकरण सुरू करण्यात आले असून, त्यासाठी जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आला आहे. सदरचे काम सुरू असतानाच वाढीव कामासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी ठेकेदाराने काम थांबवले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, हे काम कधी पूर्ण होणार याची माहिती दिली जात नाही डॉ. पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत काम केव्हा सुरू होणार आणि केव्हा नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत गोल्फ क्लब येथे धरणे सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांना अखेरपर्यंत माहिती मिळालीच नाही. पाटील यांच्या समवेत प्रभाग सभापती वत्सला खैरे, उध्दव पवार, बबलू खैरे, दर्शन पाटील आणि सुनील आव्हाड यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त