शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भ रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:32 IST

आॅनलाइन चॅटिंग आणि मोबाइल कॉलद्वारे विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा खोटे बोलून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना सध्या नित्याच्या झालेल्या असताना अशाचप्रकारे फोन करून एका अज्ञात इसमाने चक्क एका डॉक्टरला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

नाशिक : आॅनलाइन चॅटिंग आणि मोबाइल कॉलद्वारे विविध प्रकारचे आमिष दाखवून किंवा खोटे बोलून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना सध्या नित्याच्या झालेल्या असताना अशाचप्रकारे फोन करून एका अज्ञात इसमाने चक्क एका डॉक्टरला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.नाशिक शहरातील संदर्भ सेवा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला अज्ञात आरोपीने मोबाइलवरून संपर्क साधत बजाज फायनान्सचा कर्मचारी असल्याची बतावणी करीत क र्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेला ७७५६८१७२८१ या मोबाइल क्रमांकावरून एका अज्ञाताने मी बजाज फायनान्सचा कर्मचारी असल्याचे सांगत कंपनीने आपली डॉक्टरांसाठी असलेल्या ‘लोन अगेन्स इन्शुरन्स’ या योजनेसाठी निवड केली असून, आपला अपु्रव्हल आयडी ०५०२४ एमएन १८ असा असल्याचे सांगितले. तसेच लोणच्या हप्त्याच्या ७५ टक्के रक्कम सुरुवातीच्या पहिल्या वर्षात भरावे लागणार असल्याचे सांगितले. व्यवसायासाठी लोनची आवश्यकता असल्याने महिला डॉक्टरचाही त्याच्यावर विश्वास बसला. डॉक्टरांनी अज्ञातावर विश्वास ठेवून कॅनडा कॉर्नर येथील ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स येथील त्यांच्या खात्यामधून एनईएफटीद्वारे पैसे अज्ञाताच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर आरोपीने पुन्हा दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून महिला डॉक्टरशी संपर्क साधत तसेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संदेश लोन मिळवून देण्याचे सांगत बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मात्र फिर्यादीने पहिल्यांदाच अज्ञात आरोपीच्या खात्यावर पैसे जमा केलेले असल्याने त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अज्ञात आरोपीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आॅनलाइन व मोाबाइलवरून होणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात केवळ अशिक्षित अथवा सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर उच्चशिक्षत नागरिकही अडकत असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी