नाशिक : गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रूग्णावर चक्क सफाई कर्मचा-यांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रूग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रूग्णाच्या मुलाने तक्रार करूनही प्रकरण रफादफा करण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन धावपळ करीत आहे. तीन महिने उलटूनही या सा-या प्रकरणाचे सत्य अद्यापही बाहेर आलेले नाही, उलट सफाई कर्मचा-यांना नोटीसा पाठवून म्हणणे मागविण्याचा वेळकाढूपणा केला जात आहे.शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेल्या संदर्भ सेवा रूग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे असाच असून, दरदिवशी या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबतच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. येथील वैद्यकीय अधिक्षकाच्या मनमानी कारभाराला रूग्णालयातील अन्य अधिकारी व परिचारिकाही वैतागल्या आहेत. त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातून येणा-या गोरगरिब रूग्णांवर होवू लागला आहे. वैद्यकीय अधिक्षक एकीकडे व कर्मचारी दुसरीकडे असे चित्र असल्यामुळे रूग्णालयाचे व्यवस्थापन विस्कळीत झाल्याने ठेकेदारी पद्धतीने रूग्णालयाचे कामकाज करून घेतले जात आहे. शहरातील वडाळानाका येथे राहणारे नारायण रामचंद्र लासूरे यांना किडनीवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिक्षकाऐवजी चक्क रूग्णालयात ठेकेदारीवर नेमलेल्या सफाई कर्मचाºयांकरवी लासूरे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना इंजेक्शन देण्यापासून ते सलाईन लावणे, किडणी संदर्भातील चाचण्या देखील या कर्मचाºयांकरवी केल्या जात असताना लासूरे यांचे पूत्र चंद्रकांत यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. दुर्देवाने नारायण लासूरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युस वैद्यकीय अधिक्षक व उपचार करणारे सफाई कर्मचारी असल्याची तक्रार करून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत लासूरे यांनी केली आहे. आॅगष्ट महिन्यात घडलेल्या या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, संदर्भ सेवा रूग्णालयच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले जात आहे. या संदर्भात महाराष्टÑ शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे दाद मागण्यात आली असून, तक्रारदाराने चालविलेल्या पाठपुरावा पाहून वैद्यकीय अधिक्षकांनी सफाई काम करणा-या ठेकेदाराला नोटीस बजावून त्याचे म्हणणे मागविले आहे. या सा-या गोष्टीसाठी प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप लासूरे यांनी केला आहे. या घटनेमुळे रूग्णालयावरच शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली असून, व्यवस्थापनाचा मनमानी कारभारामुळे तेथील कर्मचा-यांची मानसिकताही बिघडल्याचे बोलले जात आहे.
संदर्भ रूग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:35 IST
शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेल्या संदर्भ सेवा रूग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे असाच असून, दरदिवशी या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबतच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. येथील वैद्यकीय अधिक्षकाच्या मनमानी कारभाराला रूग्णालयातील अन्य अधिकारी व परिचारिकाही वैतागल्या आहेत.
संदर्भ रूग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार
ठळक मुद्देरूग्णाचा मृत्यू : प्रकरण दडपण्ल्याची तक्रार