शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भ रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:54 IST

गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णावर चक्क सफाई कर्मचाºयांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रुग्णाच्या मुलाने तक्रार करूनही प्रकरण रफादफा करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन धावपळ करीत आहे.

ठळक मुद्देरुग्णाचा मृत्यू : रूग्णालय प्रशासनाकडून प्रकरण दडपल्याची तक्रार, कारवाईची मागणी

नाशिक : गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णावर चक्क सफाई कर्मचाºयांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रुग्णाच्या मुलाने तक्रार करूनही प्रकरण रफादफा करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन धावपळ करीत आहे. तीन महिने उलटूनही या साºया प्रकरणाचे सत्य अद्यापही बाहेर आलेले नाही, उलट सफाई कर्मचाºयांना नोटिसा पाठवून म्हणणे मागविण्याचा वेळकाढूपणा केला जात आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे असाच असून, दरदिवशी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबतच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. येथील वैद्यकीय अधीक्षकाच्या मनमानी कारभाराला रुग्णालयातील अन्य अधिकारी व परिचारिकाही वैतागल्या आहेत. त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातून येणाºया गोरगरीब रुग्णांवर होवू लागला आहे. वैद्यकीय अधीक्षक एकीकडे व कर्मचारी दुसरीकडे असे चित्र असल्यामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापन विस्कळीत झाल्याने ठेकेदारी पद्धतीने रुग्णालयाचे कामकाज करून घेतले जात आहे.शहरातील वडाळानाका येथे राहणारे नारायण रामचंद्र लासुरे यांना किडनीवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधीक्षकाऐवजी चक्क रुग्णालयात ठेकेदारीवर नेमलेल्या सफाई कर्मचाºयांकरवी लासुरे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना इंजेक्शन देण्यापासून ते सलाइन लावणे, किडणी संदर्भातील चाचण्यादेखील या कर्मचाºयांकरवी केल्या जात असताना लासुरे यांचे पुत्र चंद्रकांत यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. दुर्दैवाने नारायण लासुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस वैद्यकीय अधीक्षक व उपचार करणारे सफाई कर्मचारी असल्याची तक्रार करून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत लासुरे यांनी केली आहे.व्यवस्थापनाचा मनमानी कारभारआॅगस्ट महिन्यात घडलेल्या या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, संदर्भ सेवा रुग्णालयच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले जात आहे. या संदर्भात महाराष्टÑ शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दाद मागण्यात आली असून, तक्रारदाराने चालविलेल्या पाठपुरावा पाहून वैद्यकीय अधीक्षकांनी सफाई काम करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावून त्याचे म्हणणे मागविले आहे. या साºया गोष्टीसाठी प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप लासुरे यांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयावरच शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली असून, व्यवस्थापनाचा मनमानी कारभारामुळे तेथील कर्मचाºयांची मानसिकताही बिघडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य