शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे फुलकळ्या गळून पडल्याने अ‍ॅपल बोरांच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 18:06 IST

मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अ‍ॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अ‍ॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका

मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अ‍ॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अ‍ॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी भिवाजी गोडगे यांना गतवर्षी अ‍ॅपल बोर मधून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यंदा देखील मोठ्या अपेक्षेप्रमाणे लाखो रु पये खर्चून अ‍ॅपल बोरचे उत्पादन घेतले होते. मात्र फुलकळ्या गळून पडल्याने यंदा अ‍ॅपल बोरच्या उत्पादनात घट झाली आहे.पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत गोडगे यांनी मोठ्या मेहनतीने एक एकर शेतात अ‍ॅपल बोर फळबाग लागवड केली आहे. १० बाय १५ ईतक्या अंतरावर या अ‍ॅपल बोरच्या झाडांची लागवड केली आहे. ही झाडे जोपासण्यासाठी लाखो रु पये खर्च करून शेत हिरवेगार केले आहे. मात्र दीड महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने या अ‍ॅपल बोरांच्या झाडांना लागलेल्या फुलकळ्याच गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असताना त्याचा परिणाम आता थेट बोरांच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षी फुलकळ्या लागल्या नंतर एका झाडाला कमीत कमी तीन कॅरेट्स म्हणजेच साथ किलो इतके बोरांचे भरगोस उत्पादन निघत असताना भाव देखील चांगल्या प्रकारे मिळत होता. यंदा मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने झाडांच्या फुलकळ्या गडून पडल्याने अ‍ॅपल बोरांचे उत्पादन घटले असून एका झाडाला केवळ एकच कॅरेट्स म्हणजेच वीस किलो इतके फळ निघत असल्याने व भाव देखील कमी प्रमाणात मिळत असल्याने उत्पादन खर्च फिटणे देखील यंदा महाग झाला आहे. येवला, लासलगाव, कोपरगाव, निफाड आदी बाजार समित्यांमध्ये अ‍ॅपल बोरांना प्रतिकिलो पंचवीस ते तीस रु पयांपर्यंत भाव मिळत असून मशागतीचा खर्च तर बाजूलाच गाडी भाडे फिटने देखील दुरापास्त झाले आहे.अवकाळी पावसाने अ‍ॅपल बोरांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अवकाळी पावसाने एक एकरातील अ‍ॅपल बोरांच्या झाडांच्या फुलकळ्याच गळून पडल्याने बोरांच्या उत्पादनात घट झाली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेने यंदा निम्म्याहून अधिक बोरांचे उत्पादन घटले असून भाव देखील कमी मिळत असल्याने खर्च फिटने देखील आवाक्या बाहेर झाले आहे.- भिवाजी गोडगे,अ‍ॅपल बोर उत्पादक शेतकरी. 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक