शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लाल वादळ शमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:37 IST

नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावला परंतु, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर नाशिकच्या वेशीवरच लाल वादळ शमले. 

ठळक मुद्देलॉँग मार्च स्थगित : मुख्यमंत्र्यांशी चर्चा; नाशिकच्या वेशीवरच शिष्टाई सफल

नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावला परंतु, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंंतर नाशिकच्या वेशीवरच लाल वादळ शमले. नाशिकहून निघालेले हे लाल वादळ विल्होळी येथे दुपारच्या भोजनासाठी विसावल्यानंतर जिल्ह्णाचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आंबे बहुला गावाजवळील एका खासगी आस्थापनेच्या कक्षात किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर बव्हंशी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर, किसान सभेने लॉँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला.महाराष्टÑ राज्य किसान सभेच्या वतीने दि. ६ ते १२ मार्च २०१८ या कालावधीत नाशिक ते मुंबई विधानभवनावर पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, वर्ष उलटूनही शासनाने बव्हंशी मागण्यांची पूर्तता न केल्याने शेतकरी, आदिवासींचे हे लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने घोंगावले. आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लॉँग मार्चमध्ये राज्यभरातील हजारो शेतकरी, आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. बुधवारी(दि.२०) दिवसभरातच हजारो शेतकरी, आदिवासी बांधव नाशिकमध्ये मुक्कामी आले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्टÑीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे.पी. गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी चर्चा झाली. परंतु अपेक्षित असा तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे नियोजनाप्रमाणे गुरुवारी (दि. २१) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास लॉँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केले. काही वाहने पुढे गेल्यानंतर पाठीमागून हाती लाल झेंडे घेतलेले हजारो शेतकरी आदिवासी लॉँग मार्चमध्ये सहभागी झाले. या लॉँग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी शेतकरी-आदिवासींमुळे महामार्ग लाल रंगाने काठोकाठ न्हाऊन निघाला होता. शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया या लॉँग मार्चमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचाही सामना स्थानिक नागरिकांना करावा लागला. घोषणाबाजी करत निघालेल्या या लॉँग मार्चमध्ये आदिवासी नृत्यासह विविध लोककलेचेही दर्शन घडविले जात होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असा ठाम भाव प्रत्येक आंदोलकांच्या चेहºयावर झळकत होता. आता मागे फिरायचे नाही, असा निर्धार करत निघालेला हा लॉँग मार्च दुपारच्या सुमारास भोजनासाठी विल्होळीपुढील आंबेबहुला गावाजवळील एका मैदानात विसावला. याच आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव यांनीही सहभागी होत आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, या लॉँग मार्चच्या मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.गिरीश महाजन, जयकुमार रावल चर्चेत सहभागीविल्होळी पुढे असलेल्या आंबेबहुला गावाजवळ लॉँग मार्च दुपारच्या भोजनासाठी विसावल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत आमदार जे. पी. गावित, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांच्यासह नितीन भोसले सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवंींद्रकुमार सिंगल, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी अधिकारीवर्गही उपस्थित होता. याशिवाय बैठकीच्या वेळी भाजपाचे नाशिकमधील तीनही आमदार व काही पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चेकºयांनी आपल्या विविध मागण्या मंत्रिमहोदयांसमोर ठेवल्या. अखेरीस मुख्यमंत्र्यांशीही झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने घेण्यात आला.विविध मागण्यांसंबंधी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यात प्रामुख्याने, पश्चिम वाहिन्यांचे पाणी महाराष्टÑासाठीच वापरण्याचे आश्वासित करण्यात आले आहे. याशिवाय, दर दोन महिन्यांनी या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल.- गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक