शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कालिका यात्रेत दुकानांना पोलिसांचा ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:59 IST

घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे.

नाशिक : घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे. महामार्ग बसस्थानक ते गडकरी सिग्नल हा रहदारीचा मार्ग असून त्याठिकाणी शाळा व अन्य शासकीय कार्यालये असल्याने परवानगी देऊ नये अशाप्रकारचे पत्र पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.कालिका यात्रेत वर्षानुवर्षे पूजा साहित्य तसेच अन्य साहित्य खेळण्या यांच्या विक्रीचे स्टॉल्स उभारले जातात. महापालिका त्यासाठी स्टॉलचे भाडेदेखील घेत असते. गेल्या काही वर्षांपासून तर महापालिकेने स्टॉलच्या जागेचे लिलावदेखील केले आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणा मात्र या विक्रेत्यांना याठिकाणी बसू देण्यास परवानगी देत नाही. मध्यंतरी एक ते दोन वर्ष तर गडकरी चौक ते कालिका मंदिरदरम्यान रस्त्याच्या एका बाजूनेच दुकाने थाटण्यास परवानगी दिली होती. गेल्यावर्षी तर परवानगी न मिळाल्याने छोट्या विक्रेत्यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या घरावरच ठाण मांडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यंदा महापालिकेने पोलिसांना पत्र पाठवून यात्रेसाठी दुकाने थाटण्याबाबत विचारणा केली होती. त्या आधारे पोलीस उपआयुक्तांनी पत्र पाठवले असून त्यात दुकाने उभारण्यास रेड सिग्नल दिला आहे.वाहतुकीचा ताणमुळातच स्मार्ट रोडमुळे याठिकाणी वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यातच दुकाने उभारल्यास रहदारीस अडथळा होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरच आदिवासी विकास भवन, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, रमाबाई आंबेडकर शाळा असून त्यामुळे यात्रेच्या मार्गावर दुकाने उभारण्यास परवानगी देऊ नये असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिक