शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमणावर लाल फुली

By admin | Updated: February 25, 2015 01:10 IST

अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमणावर लाल फुली

नाशिकरोड : मुक्तिधाम समोरील जामा मशीदपासून वास्को चौक व तेथून पुन्हा छाया निवासपर्यंत मनपा अतिक्रमणविरोधी पथकाकडून मंगळवारी रस्त्यावरील अतिक्रमणावर लाल फुली मारण्यात आली. यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.मनपा अतिक्रमणविरोधी पथकाकडून जेलरोड येथे अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, दुकानदार यांनी विरोध केल्यानंतर अतिक्रमणविरोधी मोहीम बंद पडली, तर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने मोहीम बंद असल्याचे मनपाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत होते. मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने विभागीय अधिकारी किशोर चव्हाण व इतर विभागांचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात मंगळवारी दुपारी मुक्तिधाम समोरील जामा मशीदपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणावर लाल फुली मारण्यास सुरुवात केली. टपऱ्या, दुकाने, शेड, बोर्ड, ओटे आदिंवर मार्किंग करण्यात येऊ लागल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले.वास्को चौकात देवी मंदिर उद्यानाच्या भिंतीलगत व पुरबाई राजेंद्र कॉम्प्लेक्स जवळील टपरीधारकांनी न्यायालयात दावा दाखल केला असून, स्टे दिलेला आहे, असे सांगत मार्किंग करण्यास विरोध केला. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांनी तुमची कागदपत्रे कार्यालयात घेऊन या, आम्ही फक्त मार्किंग करत आहोत. कागदपत्रे बघितल्यावर पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. वास्को चौकापासून जयराम हॉस्पिटलमार्गे छाया निवासपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांवर लाल फुली मारण्यात आली. मनपाकडून अतिक्रमणावर मार्किंग करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक दुकानदारांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे, रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर लटकवलेले दुकानांचे फलक काढण्यास सुरुवात केली. या फलकांमुळे त्यामागे लपलेली दुकाने रस्त्यावरून दिसू लागली होती. काही ठिकाणी नाम फलकामुळे असलेली बजबजपुरी हटल्याने मोकळे मोकळे दिसत होते. मार्किंग करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. (प्रतिनिधी)